शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

पोलीसदादा, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? पोलिस विभागाला वाहनचालकांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 7:56 PM

केवळ ९८ वाहनचालक असल्याने वाहने चालवायला ड्रायव्हर आणायचे कोठून, असा प्रश्न आहे

नारायण बडगुजर

पिंपरी : शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाले तरी पुरेशा साधनसामुग्री व मनुष्यबळाअभावी आयुक्तालयाचा गाडा हाकताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यात केवळ ९८ वाहनचालक असल्याने वाहने चालवायला ड्रायव्हर आणायचे कोठून, असा प्रश्न आहे. याबाबत ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासनाने पोलिसांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, याची विचारणा करायला सुरुवात केली. त्याबाबत पोलीस ठाणे व सर्वच शाखांना सूचना देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांततर्गत १८ पोलीस ठाणे आहेत. तसेच गुन्हे शाखेची विविध पथके आहेत. आयुक्तालय स्तरावर स्वतंत्र वाहतूक शाखा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वाहनांची आवश्यकता आहे. आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध झाली. मात्र त्यासाठी वाहनचालक उपलब्ध झाले नाहीत. परिणामी पोलिसांची कसरत होत आहे. आरोपी पकडण्यसाठी जाताना, आरोपींना न्यायालय, रुग्णालय, तुरुंग आदी ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनचालक उपलब्ध होत नाही. तसेच विविध कारवायांसाठी जातानाही हीच अडचण येते. परिणामी पोलिसांच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

वाहन तसेच वाहनचालक उपलब्ध होत नसल्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर आयुक्तालय प्रशासनाने आयुक्तालयांतर्गत उपलब्ध कर्मचाऱ्यांमधून वाहनचालक उपलब्ध करून देण्यास हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी आयुक्तालयांतर्गत किती पोलीस कर्मचाऱ्यांकडे चारचाकी व अजवड वाहन चालविण्याचा परवाना आहे, याची माहिती मागविण्यात आली आहे. याबाबत सर्वच पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आली आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालविण्याचा परवाना घेतला असेल तसेच आयुक्तालयाच्या मोटार वाहन विभागाकडून प्रशिक्षण घेतले आहे, अशा कर्मचाऱ्यांची नावे तसेच इतर माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांची ‘ना’वाहन चालविण्याचा परवाना असला तरी, असे पोलीस कर्मचारी त्याबाबत माहिती देण्यास उत्सूक नाहीत. वाहनचालक म्हणून काम करणे पसंत नसल्याने त्यांच्याकडून प्रतिसाद नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तालय प्रशासनाची कसरत आहे.

दुष्काळात तेरावा...पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या ३४५ अधिकारी व २९३० कर्मचारी, असे एकूण ३२७५ मनुष्यबळ आहे. शहर पोलीस दलासाठी आणखी मनुष्यबळ उपबल्ध व्हावे यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र अद्याप पुरेसे मनुष्यबळ उपबल्ध झालेले नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर आयुक्तालयाचा गाडा हाकावा लागत आहे. त्यामुळे अनेक गुन्हे प्रलंबित असून कामकाजाचा ताण आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यांमधूनच वाहनचालक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या तसेच इतर विविध पथकांतील कामकाजावर परिणाम होणार आहे.    

शहर पोलीस दलातील परिस्थिती...सध्या उपलब्ध वाहनचालक - ९८आवश्यक वाहनचालक - २७७वाहनचालकांची रिक्त पदे - १७९किती वाहनचालकांचा प्रस्ताव - ३३८

अशी आहे वाहनांची आकडेवारी....अनुदेयनुसार चारचाकी - २२३अनुदेयनुसार दुचाकी - १४३उपलब्ध चारचाकी - १२६उपलब्ध दुचाकी – ११०

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस