तळेगाव स्टेशन - पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच नव्याने नियुक्तीवर आलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी १५ रोडरोमिओंना ताब्यात घेऊन त्याचे पालकांना पोलीस ठाण्यावर बोलावून रोडरोमिओंना पोलिसी हिसका दाखवून कारवाई केल्याने हुल्लडबाजी कारणाऱ्यांना चांगलीच जरब बसली आहे.तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी आपल्या सहका-याबरोबर तळेगाव स्टेशन परिसरातील इंद्रायणी महाविद्यालय परिसर आणि राव कॉलनीतील गार्डन परिसरातील रोडरोमिओंना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यावर नेले. तसेच त्यांचे पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून कारवाई केली. या वेळी पालकांनी फारच गयावया केल्याने अखेर या रोडरोमिओंना समाज देऊन सोडून दिले.तळेगाव शहरातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस, बागबगीचे आदी ठिकाणी अकारण हुल्लडबाजी कारणºया रोडरोमिओंवर कारवाई करण्याची धडक मोहीम तळेगावचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी हाती घेतली आहे. त्यात इंद्रायणी कॉलेज, परिसरातील आणि राव कॉलनी गार्डन जवळ पोलिसांनी अचानक छापे टाकून कारवाई केल्याने रोडरोमिओंची पळापळ झाली आहे.शहरात अल्पवयीन मुले-मुली बेफाम वाहने चालवीत असतात अशा मुला-मुलींवर तसेच त्यांचे पालकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांनी सांगितले. याशिवाय विना परवाना गाडी चालविणे, टीबलसिट वाहन चालविणे यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांनी सांगितले. या रोडरोमिओंवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी याचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे, सोनावणे, पोलीस नाईक महेश दौडकर, नितीन गार्डी, युवराज वाघमारे, प्रकाश वाबळे, सागर नामदार आदी सहभागी झाले होते.दरम्यान, या भाईगिरीच्या जाळ्यात जास्त प्रमाण अल्पवयीन मुलांचा असल्याचे दिसून येत आहे . शाळा ,महाविद्यालय परिसरात अशी भाईगिरी उदयास येत आहे . मिसरूड न फुटलेल्या अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीची क्रेज मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागली आहे. या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या फोडण्याचा नवीन फंडा या गुन्हेगारी विश्वात येऊ लागला आहे. अशा तोडफोड प्रकरणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग हि विशेष बाब आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांबाबत सजग राहण्याची गरज आहे, असे मत परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.मावळ तालुक्यात जमिनींना मोठा भाव आल्याने मुलांमध्ये वाढदिवस साजरे करण्याची क्रेझ वाढली आहे. त्यासाठी वारेमाप प्रमाण पैसा खर्च होत आहे. त्यामुळे गुन्हेगारीचेप्रमाणही वाढत चालले आहे. अनेकवेळा महाविद्यालयाच्या परिसरात लहान मोठी भांडणे होत आहेत. त्यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. वाढत्या गुन्हेगारीबाबत शहरवासीयांतून नाराजी व्यक्त होत आहे.१सध्या सोशल मीडियाचे जग झाले असून तरुणाई या जगात प्रमाणावर गुरफटली आहे . त्यातून वाढलेल्या स्पर्धा जीवघेण्या ठरत असल्याची अनेक उदाहरणे आहेत . फेसबुकचा गैरवापर वाढत्या गुन्हेगारीचे मूळ आहे. अलीकडच्या काळात आऊट डोअर फोटोग्राफीचा नवा ट्रेंड बाजारात सुरु झाला आहे. गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकण्याआधी फेसबुकवर दहशत निर्माण करण्यासाठी असे एडिट केलेले फोटो वापरले जातात.२ हातात कोयता, तलवार, बनावट पिस्तूल घेऊन फोटो काढले जातात. विलन लूक येण्यासाठीचा मेकअप देखील जातो व अशा फोटो फोटोखाली समाजात दहशत पसरेल अशी फिल्मी डायलॉग टाईप करून बिनधास्त अपलोड केले जातात. मग सुरु होतो लाईक, कमेंटचा खेळ. ज्याला जितक्या लाईक अन कमेंट तितकी त्याची दहशत असा सरळ तर्क काढला जातो. यातूनच फेसबुकवर ग्रुप तयार होतात. अन् त्यांच्यातील वैर वाढत जाते. अशा फेसबुक गुंडाना वेळीच आवर घातल्यास भविष्यात होणाºया गुन्हेगारी कारवायांना आवर घालणे शक्य आहे.
पोलिसांचा रोडरोमिओंना दणका, पोलिसी हिसका दाखवून हुल्लडबाजांना रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 2:18 AM