पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीच्या प्रचारात काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील केंद्र आणि राज्यातील मात्तबर नेत्यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे नेत्यांची जुगलबंदी, शाब्दिक कोट्या, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अनुभवयास मिळणार आहे. नेत्यांचा राजकीय फड अनुभवयास मिळणार आहे.
महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे नेत्यांच्या सभांचे फड गाजणार आहेत. स्टार प्रचारकांना आणण्याचे प्रयत्न सर्वच राकजीय पक्षांकडून केले जात आहे. काँग्रेसच्या वतीने युवानेते राहूल गांधी, नवज्योतसिंग सिद्धू, ज्योतिरादित्य शिंदे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुकुल वासनीक, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, नारायण राणे हे सहभागी होणार आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्मृती इराणी, हेमा मालिनी, खासदार किरीट सोमय्या, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, राष्टÑवादी कडून खासदार शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हे सहभागी होणार आहेत. तस शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, डॉ. अमोल कोल्हे, गुलाबराव पाटील, नितीन बानगुडे पाटील हे सहभागी होणार आहे. त्याबरोबर मनसे, आम आदमी पार्टी, बसपा, एमआयएम, रासप आदी पक्षांच्या वतीने स्टार प्रचारकांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे नेत्यांचा राजकीय फड अनुभवयास मिळणार आहे.