शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

...आता दोन वेळा पाण्याचेही राजकारण

By admin | Published: January 09, 2017 3:00 AM

महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारपासून मिळणार दोन वेळा पाणी, अशी घोषणा केली असली तरी त्यात तांत्रिक अडचणी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पुणे : महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारपासून मिळणार दोन वेळा पाणी, अशी घोषणा केली असली तरी त्यात तांत्रिक अडचणी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यावरून दोन वेळा पाणी देण्यातही राजकारण साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुंबईतील कालवा समितीच्या बैठकीनंतर पुण्याला लवकरच दोन वेळा पाणी सुरू करणार, अशी घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच महापौर जगताप यांनी सोमवारपासून (दि. ९) दोन वेळा पाणी मिळणार असे जाहीर केले. मात्र, प्रशासनाने इतक्या त्वरेने हा निर्णय अमलात आणणे शक्य नाही, असे स्पष्ट केले असल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांनी तांत्रिक अडचण सांगितली असल्याची माहिती मिळाली. पाणीपुरवठा विभागाचे काम पाहणारे कनिष्ठ अभियंते निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. तसेच, पाणी सोडण्याचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्हॉल्वमन पर्यंत ही माहिती पोहोचवणे याला वेळ लागणार, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दोन वेळा पाणी सोडायचे असेल, तर त्यासाठी प्रशासनाला नवे वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. पाण्याची उपलब्धता असली तरी सध्या त्याचे समान वाटप होत नाही, असे प्रशासनााचे म्हणणे आहे. काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरात काम करणाऱ्या पाणी पुरवठा विभागातील अभियंते, कर्मचारी यांच्यावर दबाव आणून नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ पाणी मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.(प्रतिनिधी)