पिंपरी : मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशिन (मतदान यंत्रे) बालेवाडी शिवछत्रपती क्रीडासंकुलातील स्ट्रॉँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून, २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सुरक्षेचे कडे स्ट्राँगरूमला असणार आहे. एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी असणार आहेत. मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी बालेवाडी येथे होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्णत्वास आली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस असे तीन टप्पे आहेत. तीनही ठिकाणी तपासणी केली जाते. सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस ओळखपत्राची तपासणी करतात. त्यानंतर राज्य राखीव पोलिसांकडून यंत्रांच्या माध्यमातून तपासणी केली जाते. केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे मोबाइल व इतर वस्तूंची तपासणी केली जाते. याशिवाय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मतमोजणी कक्षात कोणालाही मोबाइल आतमध्ये नेण्यास परवानगी नाही. निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान अधिकारी कोणीही मोबाइल आतमध्ये नेऊ शकत नाही.मतमोजणीची तयारी पूर्णत्वासमावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी ९२ टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी, रनर, कोतवाल असे सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी असणार आहेत. मतमोजणी कर्मचाºयांना १६ आणि २२ मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणीसाठी १४ टेबल असणार आहेत. तर, पोस्टल मतदानासाठी आठ टेबल अशा एकूण ९२ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघ सर्वांत मोठा आहे. त्यासाठी जागेची थोडी समस्या आहे. मतमोजणीच्या एका टेबलवर चार अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक आणि एक शिपाई असे चार कर्मचारी एका टेबलवर असतील. मतमोजणी कर्मचाºयांना प्रशिक्षणईव्हीएम ने-आण करण्यासाठी रनर, स्ट्राँग रूमसाठी, वाहतूक, खानपान सुविधेसाठी, कोतवाल असे एकूण सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणी दिवशी कार्यरत असणार आहेत. पुरेसे कर्मचारी उपलब्ध आहेत. मतमोजणी कर्मचाºयांना १६ आणि २२ मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील पाच ह्यव्हीव्हीपॅटह्ण मशिनची तपासणी केली जाणार आहे.
मावळ व शिरुर मतदारसंघातील मतदान यंत्रे स्ट्राँग रुम' मध्ये सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 9:00 AM
मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी बालेवाडी येथे होणार आहे.
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाच्या निकषांनुसार सुरक्षा यंत्रणा तैनात, चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे