मोशी : महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडक उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी मतदार सकाळीच घराबाहेर पडल्याने केंद्राबाहेर मोठमोठाल्या रांगा लागल्या होत्या. पहिल्या दोन तासांतच शहरातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, दुपारनंतर मतदान केंद्रांवर काही अंशी शुकशुकाट होता. शेवटच्या दोन तासांत पुन्हा मतदारांची गर्दी झाली. मोशी चऱ्होली व डुडुळगाव प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांचे मतदान केंद्र मोशी महापालिका शाळा ,डुडुळगाव शाळा ,श्री नागेश्वर विद्यालय ,चऱ्होली महापालिका शाळा ,गंधर्व नगरी शाळा ,पठारे मळा शाळा अश्या ठिकाणी मतदान केंद्र होते. दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. (वार्ताहर) महापालिकेच्या निवडणुकीसाठी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली. सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात असल्याने मतदान केंद्रांचा परिसर राजकीय कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. मतदान केंद्रांवर हळूहळू मतदारांची गर्दी होत गेली. दुपारी १२ पर्यंत शहरातील मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदान केंद्राबाहेर थाटलेल्या बूथवरील प्रतिनिधींकडून नावे शोधण्याची धावपळ सुरू होती.
उन्हाच्या तडाख्यातही मतदान
By admin | Published: February 22, 2017 2:42 AM