पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरानामुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दिवसभरात ६७९ रुग्ण आढळले असून, ९४४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरातील १२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सोमवारी ३१७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत असून, दिवसभरात २ हजार ०३० जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १ हजार १११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या २९ हजार ८३६ वर पोहोचली आहे. तर २ हजार ७०४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ३१७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार १४६ झाली आहे. .........................................
कोरोनामुक्तीचे प्रमाण अधिकदाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतिक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पॉझिटिव्ह येणाऱ्यांच्या प्रमाणापेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. दिवसभरात ९४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण २१ हजार २०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.......................................
मृतांमध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक शहरातील ११ आणि इतर भागातील १ अशा एकूण १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात तरूणांची आणि वृद्धांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ४९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात पिंपरी येथील ८० वर्षीय महिलेचा, इंद्रायणीनगर येथील ५० वर्षीय पुरुषाचा, दिघी येथील ७८ वर्षी पुरुषाचा, पिंपळेगुरव येथील ४५ वर्षी पुरुषाचा, संभाजीनगर येथील ३९ वर्षीय महिलेचा, चिंचवडगाव येथील ६५ वर्षीय पुरुषाचा, रुपीनगर तळवडे येथील ५२ वर्षीय पुरुषाचा, देहूगाव येथील ८० वर्षीय पुरुषाचा, रुपीनगर येथील ३५ वर्षीय महिलेचा, निगडी येथील ७५ वर्षीय पुरुषाचा, सांगवीतील ६७ वर्षीय महिलेचा पुरुषाचा, चिखली येथील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.