बलभीम भोसले, पिंपळे गुरव येथील विल्यमनगर, ओंकार कॉलनी, त्रिमूर्तीनगर, भाऊनगर, पंचरत्ननगर आदी परिसरात उच्च दाबाच्या वीज तारांमुळे स्पार्क होऊन आगीची दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून भूमिगत केबलच्या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. परिसरातील बहुतांश ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी अनेक वर्षांपासून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटून कामाच्या संदर्भात चर्चा केली आहे. सहा महिन्यांपूर्वी महावितरणकडून या कामास मान्यता दिली आहे. मात्र या कामाचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे. कंपनीकडून या कामात चालढकल क ेली जात आहे. केबलचे शॉर्टेज आहे. काम सुरू करणार आहे. या प्रकारची विविध कारणे सांगितली जात आहेत. ३० वर्षांपासून एकच वीजमीटर असून, एकाच मीटरवर संपूर्ण इमारतीचे कनेक्शन आहे. त्या इमारत मालकावर कारवाई केली जात नाही. याबाबत १ जून २०१५ रोजी वरिष्ठ अभियंता यांच्याकडे तक्रार केली होती. तीन मीटर खोदाई करून भूमिगत केबल टाकायची असताना कमी रुंदीची केबल टाकली जाते. कंत्राटदार व महावितरण यांच्या संगनमताने दीड मीटर खोदाई करून केबल टाकली जाते. नंतरच्या खोदकामामुळे केबल तुटते. त्यामुळे अनेक दिवस वीज बंद होण्याचे प्रकार घडतात. अधिकृत वीजमीटर घेण्यासाठी २५०० रुपये खर्च अपेक्षित असताना महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एजंटद्वारे ग्राहकांकडून ८ ते १० हजार रुपये घेतले जातात. या एजंट लोकांना महावितरणकडून पाठबळ मिळत आहे. - राजेंद्र जगताप, नगरसेवक
जर एखाद्या एजंटने वीज मीटरसाठी अधिक रक्कत घेतली असेल, तर त्याचे पुरावे द्यावेत. संबंधितावर लगेच कारवाई केली जाईल. या भूमिगत कामामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. दोन दिवसांच्या आत या कामास सुरुवात केली जाईल. बीव्हीजी कंपनीकडे गणेशोत्सव काळामध्ये मजूरवर्ग उपलब्ध नव्हता. या कामामध्ये लक्ष घालून दोन दिवसांच्या आत या कामास सुरुवात करणार आहे. - धनंजय औंढेकर, कार्यकारी अभियंता, महावितरण वीजवाहक तारांच्या खाली पदपथ असल्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्यावर भाजीविके्रते, वडापाव, पीठ गिरणी, किराणा आदीची दुकाने असल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी ये-जा करतात. या वीजवाहक तारा रस्त्यावरील झाडांमध्ये अडकल्यामुळे संततधार पावसामध्ये झाडावर स्पार्किंग सुरूअसते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. - संदीपान बोऱ्हाडे, रहिवासी