शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

बटाट्यांची विक्रमी आवक

By admin | Published: March 20, 2017 4:28 AM

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण बाजारात कांद्याची आवक सलग तिसऱ्या

आसखेड : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण बाजारात कांद्याची आवक सलग तिसऱ्या सप्ताहात घटून भाव मात्र वधारले. कोबी, फ्लॉवरसह बटाट्याची उच्चांकी आवक झाली. जळगाव शेंगाही आवक चांगलीच झाली. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपूसह पालक भाजीची प्रचंड आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घसरण झाली. एकूण उलाढाल २ कोटी ९० लाख रुपये झाली.चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १५ हजार ३०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९ हजार ७०० क्विंटलने घटून भावात ५१ रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव ६५० रुपयांवरून ७०१ रुपयांवर पोहोचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १ हजार १०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढल्याने भावात १०० रुपयांची घसरण झाली. बटाट्याचा कमाल भाव ९०० रुपयांवरून ८०० रुपयांवर स्थिरावला.जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक ४ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १ क्विंटलने वाढूनही कमाल भाव ७ हजार रुपयांवर स्थिरावले. बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक व कमाल भाव १ हजार २०० रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३४८ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३६२ क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला १,००० ते ३,००० रुपये असा कमाल भाव मिळाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर या मुख्य बाजारात व शेलपिंपळगाव येथील पालेभाज्यांच्या उपबाजारात शेपू व पालक भाज्यांची काहीच आवक झाली नाही. (वार्ताहर)