शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत झाल्यास महावितरणला टाळे ठोकू : आमदार लांडगेंचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 6:39 PM

पावसाला सुरुवात होताच वीज खंडित होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून भोसरी एमआयडीसीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लघुउद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

पिंपरी: पावसाला सुरुवात होताच वीज खंडित होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून भोसरी एमआयडीसीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लघुउद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी . येत्या दोन दिवसांत सर्व तक्रारींचे निराकरण करून वीजपुरवठा सुरळीत करा. अन्यथा येत्या शनिवारी भोसरी, बालाजीनगर येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला.

भोसरी मतदारसंघातील विजेच्या समस्या संदर्भात आणि पावसाळ्यात सातत्याने होणा-या खंडित वीज पुरवठ्याबाबत महावितरणचे अधिकारी, महापालिका विद्युत विभागाच्या अधिका-यांची  लांडगे यांनी बैठक घेतली. त्यात दोन दिवसांत विजेच्या सर्व समस्या मार्गी लावव्यात. महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना अधिका-यांना दिल्या.भोसरीतील 'ई' क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीला महापौर राहुल जाधव, महावितरणचे पुणे जिल्ह्याचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता पंकज तगडपल्लेवार, कार्यकारी अभियंता राहुल गवारी, क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, 'इ' प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, नगरसेविका नम्रता लोंढे, माजी नगरसेवक भीमा बोबडे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, परिक्षीत वाघेरे, लघुउद्योजक संघटनेचे सचिव जयंत कड, महापालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुबे, प्रवीण घोडे, देशमुख उपस्थित होते.‘‘गेल्या तीन दिवसांपासून भोसरीच्या विविध भागात वीज खंडित होण्याचा घटना घडल्या आहेत. दररोज चार-चार तास वीजपुरवठा खंडित होत आहे. परिवर्तन हेल्पलाईनवर तीन दिवसात सुमारे पाचशेतक्रारी आल्या आहेत. पावसाळ्यापूवीर्ची कामे अगोदरच पूर्ण करणे अपेक्षित होते. यापुढे फांदी तुटली, ट्रान्सफॉर्म उडाला, साहित्य नाही अशी कारणे चालणार नाहीत. नागरिकांना अंधारात ठेवू नका. पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होता कामा नाही. पावसाळ्यात दुरुस्तीच्या कामासाठी अधिकच्या कर्मचा-यांची नियुक्ती करा. पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. वीज नसेल तर नागरिकांना वरच्या मजल्यावर पाणी नेता येत नाही. उद्योजकांकडून महावितरणला अधिकचा महसूल मिळतो. काही ठिकाणाचे ट्रान्सफर 'ओव्हर' लोड झाले असून ते बदलण्यात यावेत. महावितरणमधील एजंटगिरी बंद करावडमुखवाडी, दिघीगाव, काळजेवाडी, भोसरीगाव, चिखली, तळवडे, मोशीतील प्रलंबित असलेले वीज मीटर त्वरित ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात यावेत. धोकादायक वायर 'अंडरग्राऊंड' कराव्यात. डीपी, ट्रान्सफॉर्मर झाकून ठेवा. जेणेकरुन पावसाळ्यात कोणाचा हात लागून विजेचा धक्का बसणार नाही.  पावसाळ्यात जिथे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. अशी ठिकाणी शोधा. तिथे अगोदरच दुरुस्तीची कामे करा. फांद्या तोडण्यासाठी महापालिकेची मदत लागल्यास ती मदत घ्यावी. महावितरणचे कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना योग्य ती समज देण्यात यावी. लोकप्रतिनिधींपेक्षा एजंटची कामे वेगात होतात.मोईचा क्रशर मशिनचा वीज पुरवठा खंडित करा चाकण, मोईतील खाण खोदण्यासाठी वापरण्यात येणा-या क्रशर मशिनसाठी भोसरीतील महावितरण कार्यालयातून वीजपुरवठा केला जातो. मोईकरांना  वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्याची सूचना सहा महिन्यांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता त्यांना दिला जाणारा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा. अशी सूचना करण्यात आली.

टॅग्स :Power ShutdownभारनियमनMLAआमदारbhosariभोसरी