लोणावळा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लोणावळा ग्रामीण परिसरातील दहा जणांवर भादंवि कलम १४४ (२) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती वरिष्ठ सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांनी दिली.ग्रामीण परिसरातील कुसगाव व पवनानगर ही दोन गावे संवेदनशील घोेषित करण्यात आली आहे. निवडणुकीच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे. किरण येवले (वाकसई), मंगेश देशमुख व रवींद्र देशमुख (देवघर), शुभम गाडे, जयराम भोसले व किरण साळवी (कुसगाव), भाऊ गायकवाड, अनंता घुले व वैभव गायकवाड (ओळकाईवाडी), अशोक ठुले (डोंगरगाव) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.(वार्ताहर)
लोणावळ्यात १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By admin | Published: February 19, 2017 4:41 AM