पिंपरी : टंचाईचे संकट गडद होत असतानाच पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात ४ मेअखेर ९५.८० दशलक्ष घनमीटर (दलघमी) म्हणजेच ३९.७६ टक्के साठा शिल्लक आहे. मागील वर्षापेक्षा हे पाणी अधिक आहे. आंद्रा धरणात ५६.१७ दलघमी (६७.६६ टक्के) पाणी उरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे पाणी दहा टक्क्यांहून अधिक असून, शहरवासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. पवना धरणाची साठवणूक क्षमता २७३.८५ दलघमी (९.६७ टीएमसी) आहे. मागील वर्षी याच कालावधीपर्यंत धरणात ८३.८५ दलघमी पाणी शिल्लक होते. त्यातच पाऊस लांबल्याने पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली होती. मात्र, या वर्षी अवकाळी पावसाची शेतकऱ्यांवर अवकृपा झाली असली, तरी धरणातील पाणीसाठा वाढण्यात त्यामुळे मदत झाली आहे. त्यामुळे धरणात ४ मेपर्यंत ९५.८० दलघमी पाणी आहे. इतर धरणांमध्येही पुरेसे पाणी आहे. पाऊस वेळेत झाल्यास शहराला पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याची परिस्थती आहे. त्यातच मंगळवारी पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळण्याचे चित्र तयार झाले आहे.(प्रतिनिधी)धरणपाणी दलघमीत टक्केवारीमागील वर्षाचा साठा(कंसात टीएमसीत)(दलघमीत)पवना९५.८० (३.३८)३९.७६८३.८५वडिवळे१८.२९ (०.६६)६०.१८११.६२आंद्रा५६.१७ (१.९८)६७.८८४६.७५कुसगाव७.७१ (०.२७)४८.०१५.४९मुळशी९८.८१ (३.४९)१८.९०९३.३०
पाणीटंचाईचे संकट टळणार
By admin | Published: May 06, 2015 6:08 AM