पिंपरी : महापालिका आयुक्त आणि लघुउद्योजक संघटनेची नुकतीच आयुक्तांसमवेत बैठक झाली. या वेळी लघुउद्योजकांनी समस्यांचे गाºहाणे मांडले.या वेळी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, उपाध्यक्ष संजय जगताप आदी उपस्थित होते.या बैठकीमध्ये औद्योगिक परिसरातील ड्रेनेज, सीईटीपी प्लँट, पेठ क्र. १० येथील पालिकेचे कचरा विलगीकरण केंद्र, नालेसफाई या संदर्भात चर्चा झाली. टी पुनर्वसनाबाबत पालिकेचा दर उद्योजकांना मान्य नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. सदर गाळे विकत घेण्यापेक्षा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली. पालिकेचे सुरू असलेल्या कचरा विलगीकरण केंद्राला संघटनेने आक्षेप घेतला. या केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, कंपन्यांमध्ये काम करणाºया कामगारांना काम करणे अशक्य झाले आहे. डेंगी, मलेरियासारखे अनेक आजार पसरण्यास पोषक वातावरण झाले आहे. कचरा विलगीकरण केल्यानंतर उरलेला कचरा जाळला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून, कामगारांना श्वसनाचा त्रास होत आहे. या वेळी आयुक्तांनी कचरा जाळण्यास मनाई असल्याचे सांगितले. औद्योगिक परिसरात तसे करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल. औद्योगिक परिसरात गाड्या उपलब्ध करून रस्ते सफाई केली जाईल, अशी माहिती लघुउद्योजक संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.
उद्योजकांनी मांडले समस्यांचे गा-हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 6:44 AM