शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

संस्कार प्रतिष्ठानच्या संचालकांविरुद्ध फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 4:39 AM

आर्थिक लाभाचे आमिष दाखविणाºया विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला तसेच अन्य नागरिक यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांना लाभ अथवा गुंतवणुकीची

पिंपरी : आर्थिक लाभाचे आमिष दाखविणाºया विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला तसेच अन्य नागरिक यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांना लाभ अथवा गुंतवणुकीची रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केली, अशी फिर्याद संस्कार ग्रुपच्या अध्यक्षासह संचालकांविरोधात दाखल करण्यात आली आहे. जानेवारीत गुन्हा दाखल झाला होता, आणखी काही महिलांनी नुकतीच दिघी पोलीस चौकीसमोर निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी त्या महिलांची तक्रार दाखल करून घेतली आहे.संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक वैकुंठ कुंभार, अभिषेक घारे, राजू बुचडे व अन्य संचालक, कार्यालयीन कर्मचारी, एजंट यांच्याविरोधात पोलिसांकडे गुंतवणूकदारांच्या तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुणे-आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी येथे संस्कार ग्रुपचे कार्यालय आहे. संस्कार ग्रुपच्या नावाखाली शैक्षणिक उपक्रम, रियल इस्टेट, बचत गट एकत्रीकरण, संस्कार एज्युकेशन सोसायटी, विमा योजना, संस्कार क्लब अशा विविध फर्मच्या माध्यमातून १५ मार्च २०१३ ते फेब्रुवारी २०१६ पर्यंत गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले. गुंतवणूकदारांना जादा व्याज, नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले गेले. संस्कार महिला बचत गट महासंघाच्या माध्यमातून जमा केलेले २९ लाख १० हजार ५६६ रुपये अद्याप गुंतवणूकदारांना परत दिले गेले नाहीत.त्यामुळे संस्कार ग्रुपचे संचालक, कार्यालयीन कर्मचारी आणि एजंट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमिला दरेकर यांच्या पुढाकाराने महिलांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिघी पोलीस चौकीत संस्थापक वैकुंठ कुंभार यांच्यासह राणी कुंभार आणि संचालक, एजटांविरोधात फिर्याद दिली आहे. संस्कार प्रतिष्ठानच्या विरोधात आवाज उठवूनही पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नाही. याबद्दल महिलांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.- पोलिसांकडून संस्कार प्रतिष्ठानच्या संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात हलगर्जीपणा दाखविला जात असल्याचा आरोप गुंतवणुकदारांनी केला. या बद्दल दिघी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक खंडेराव खैरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले अध्यक्ष, संचालक, एजंट अशा सहा जणांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल केलेला आहे. त्यातील तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. उर्वरित तीन जण फरार आहेत. पोलिसांकडून आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे.