पिंपरी : व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करूनही आणखी रक्कम मिळावी, यासाठी खासगी सावकारांनी तगादा लावल्याने चिंचवड येथील प्रसाद कदम हे व्यावसायिक घरातून निघून गेले आहेत. चार महिन्यांपासून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. घरातून निघून जाण्यापूर्वी त्यांनी सावकारी छळामुळे घर सोडून जात असल्याची लिहून ठेवलेली चिठ्ठी कुटुंबीयांना आढळून आली आहे. एकीकडे बेपत्ता व्यक्तीचा शोध लागत नाही, तर दुसरीकडे या कुटुंबीयांकडे कर्ज रकमेचीमागणी होत आहे. त्यामुळे आम्ही सावकारी दहशतीखाली वावरत आहोत, अशी व्यथा कदम यांच्या पत्नी सविता कदम यांनी पत्रकार परिषदेत मांडली.कदम यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ज्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले, त्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक लिहिलेले आहेत. (प्रतिनिधी)
सावकारी जाचामुळे व्यावसायिक बेपत्ता
By admin | Published: August 28, 2015 4:22 AM