पिंपरी : केंद्र शासनातर्फे देण्यात येत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये कपात करण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे निदर्शने केली.यापूर्वी संबंध ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जवळपास ५०० कोटी रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. ही रक्कम ५० कोटी रुपयांवर आणली़ या निर्णयाच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन पत्र देण्यात आले. आंदोलनात मोठ्याप्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते.शहराध्यक्ष संजोग वाघेरे, अॅड. सचिन औटे, शहर संघटक विजय लोखंडे, विद्यार्थी शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, सुनील कड, राहुल आहेर, सतीश चोरमले, उत्तम आल्हाट, डॉ. माजी महापौर वैशालीताई घोडेकर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, मंदाताई आल्हाट, मीनाक्षीताई उंबरकर, प्राजक्ता कलगुंडे, शकुंतला भाट, विशाल काळभोर आदी उपस्थितहोते.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:46 AM