पिंपरी : अध्यक्षांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची पहिली सभा लांबणीवर पडली. लवकरच कंपनीची सभा होणार असून नवीन सदस्यांना सामावून घेणे, कंपनी सचिव नियुक्त करणे, कंपनी सील, पॅनसिटी आणि एरिया बेस प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्तीचा विषय यांवर चर्चा होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकासासाठी देश पातळीवरील शंभर शहरांचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार स्पर्धाही घेण्यात आली. मात्र, गुणवत्ता असतानाही स्मार्ट सिटीत समावेश झाला नव्हता. त्यामुळे पहिल्या आणि दुसºया यादीत शहरावर अन्याय झाला होता. दरम्यान पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पिंपरी-चिंचवडचा समावेश करू, असे आश्वासन दिले होते. महापालिका निवडणुकीनंतर या संदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यास मंंजुरी मिळाली. त्यानंतर एसपीव्हीची स्थापना करण्यात आली. तसेच प्रशासनाने पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले. कंपनी स्थापनेनंतर पहिली बैठक, सभा महापालिकेतील मुख्य भवनात सभा शनिवारी सकाळी ११ला होणार होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर असणार होते. तसेच या बैठकीस संचालक मंडळातील सदस्य उपस्थित राहणार होते.पहिल्या बैठकीस अध्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक असते. कंपनी कायद्यानुसार सभेचे कामकाज चालविण्यात येते. मात्र, अध्यक्ष अनुपस्थित राहिले. त्यामुळे नियोजित सभा रद्द करण्यात आली.लवकरच होणार सभा : श्रावण हर्डीकरयाबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी कंपनीची पहिली बैठक आज होणार होती. मात्र, अध्यक्षांना ऐनवेळी महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी कळविले होते. तसेच सर्व सदस्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यामुळे नियोजित बैठक रद्द केली आहे. लवकरच ही बैठक घेण्यासाठी नियोजन केले जाईल.’’
स्मार्ट सिटीची बैठक लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 4:03 AM