पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिवाळीच्या तोंडावर बढती आणि बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. विविध विभागातील २२४ कर्मचारी, अधिकाºयांना बढती देण्यात आली आहे. तर १८ जणांची एका विभागातून दुसºया विभागात बदली केली आहे. काही जणांना मोक्याची पोस्टिंग देऊन दिवाळीची बक्षिसी महापालिका सत्ताधारी व प्रशासनाने दिली आहे.महापालिका आस्थापनेवर चतुर्थ श्रेणीतील ४,१८१ कर्मचारी तर तृतीय श्रेणीतील २,९८७ कर्मचारी कार्यरत आहेत. पालिकेतील तृतीय श्रेणीतील कारकून संवर्गातील रिक्त पदे बढतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी चतुर्थ श्रेणीतील कारकुन पदाची अर्हता धारण करणाºया पात्र कर्मचाºयांकडून अर्ज मागविले होते. महापालिकेत कारकुन या संवर्गाची सातशे पदे मंजूर आहेत. या संवर्गामध्ये रिक्त असणारी पदे बढतीने भरण्यासाठी मागील महिन्यात पदोन्नती समिती सभा घेतली होती. या समितीने कारकुन पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता, अनुभव, गोपनीय अहवाल, सेवा ज्येष्ठता, आरक्षण याबाबी विचारात घेऊन चतुर्थ श्रेणी संवर्गातील पात्र कर्मचाºयांना कारकुन पदावर बढती देण्यास शिफारस केली. त्यानुसार ११३ चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आता कारकुन होणार आहेत. तर ८१ कारकुनांनाही आता मुख्य कारकुन पदावर बढती मिळाली आहे.महापालिकेत कार्यालयीन अधीक्षक पदावर १६ कर्मचाºयांना बढती दिली आहे. मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून एका कर्मचाºयाला बढती मिळाली आहे. तसेच चार मुख्य आरोग्य निरीक्षकांना सहायक आरोग्याधिकारी पदावर बढती दिली आहे. अग्निशामन विभागातील तीन फायरमन आता बढतीने लिडिंग फायरमन होणार आहेत. तर एका लिडिंग फायरमनला उप अधिकारी म्हणून बढती मिळाली आहे. वीजतंत्री संवर्गातील वायरमन आणि जनरेटर आॅपरेटर अशा दोघांना वीजतंत्री पदावर बढती मिळाली आहे. वैद्यकीय विभागातील स्फाफनर्स पदावरील तीन जणींना सिस्टर इनचार्ज म्हणून बढती देण्यात आली आहे. तर एका सिस्टर इनचार्जला असिस्टंट मेट्रन म्हणून बढती दिली आहे.क्रीडा विभागाची जबाबदारी लोणकरांकडे१ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनात काही बदल केले आहेत. क्रीडा विभागाची जबाबदारी सहायक आयुक्त योगेश कडूसकर यांच्याकडून काढून सहायक आयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे़ याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले आहेत. महापालिकेच्या क्रीडा विभागाचे कामकाज व्यवस्थित होत नाही. पालिकेच्या क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. सहायक आयुक्त योगेश कडूसकर यांचे क्रीडा विभागाकडे लक्ष नाही. ते नगरसेवकांचे फोनदेखील उचलत नाहीत, अशा अनेक तक्रारी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात केल्या होत्या. तसेच त्यांच्याकडून क्रीडा विभाग काढून घेण्याची मागणीदेखील नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर आता आयुक्तांनी कडूसकर यांच्याकडील क्रीडा विभागाचा पदभार काढून घेतला आहे. सहायक आयुक्त योगेश कडूसकर यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभाग, क्रीडा विभाग आणि झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग होता. आता त्यांच्याकडून क्रीडा विभाग काढून फ प्रभागाचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे क्रीडा विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे.दिवाळीच्या तोंडावर बदलीसत्र२दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळीच्या तोंडावर बदल्यांना पेव फुटत असते. सत्ताधाºयांनी काही जणांना आपल्या आवडत्या ठिकाणी पोस्टिंग करून दिवाळी बक्षिसी दिली आहे. सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकाºयांनी मिळून बदल्या आणि बढत्या केल्या आहेत.बदली रोखण्यासाठी दबाव३महापालिका शिक्षण मंडळातील एका जागेवर असणाºया टेंडर क्लार्कची बदली केली आहे. मात्र, हा टेंडर क्लार्क सत्ताधाºयांपैकी एका पदाधिकाºयाचा जवळचा आहे. त्यामुळे त्यांची बदली रोखण्यासाठी महापालिकेतील तिसºया मजल्यावरून पदाधिकाºयांकडून दबाव आणला जात आहे. बदली होऊनही संबंधित व्यक्ती बदलीच्या ठिकाणी रुजू झालेला नाही. बदली रद्दसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
दिवाळीच्या तोंडावर बढतीचे बक्षीस, २२४ अधिकारी-कर्मचाºयांना पदोन्नती, १८ जणांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 6:45 AM