शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

पाणी योजनेसाठी सल्लागाराला चार कोटी देण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 1:27 AM

अमृत अभियानांतर्गत शहरातील विकसित होणाऱ्या ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे.

पिंपरी : अमृत अभियानांतर्गत शहरातील विकसित होणाऱ्या ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या निविदा पूर्व आणि निविदापश्चात कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे.औद्योगिकनगरीची लोकसंख्या २२ लाखांवर गेल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधाºयातून शहरातील निवासी विभागासाठी प्रतिदिन सरासरी ४९० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. तसेच एमआयडीसीकडून प्रतिदिन सरासरी ३० दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येते. जलवितरणामध्ये पाणीगळती सुमारे ४० टक्के आहे. पाणीपुरवठा गळती कमी करण्यासाठी जेएनएनयूआरएमअंतर्गत ४० टक्के भागासाठी २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम सुरू आहे. तसेच ‘अमृत’अंतर्गत उर्वरित ६० टक्के भागामध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे या प्रकल्पाचे काम चार टप्प्यांत सुरू आहे. या दोन्ही प्रकल्पांतर्गत जीआय पाइपचे जुने नळजोड पाइप बदलणे, हायड्रॉलिक डिझाईननुसार नवीन पाइपलाइन टाकणे, जुन्या पाइपलाइन बदलणे ही कामे करण्यात येत आहेत.किवळे, मामुर्डी, वाकड, चºहोली, वडमुखवाडी, डुडुळगाव, चिखली हा समाविष्ट ग्रामीण भाग वेगाने विकसित होत आहे. पूर्वी विकसित नसलेल्या काही भागाचा समावेश प्रकल्पात नव्हता. त्यामुळे नव्याने नियोजन केले जाणार आहे. भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून डीआरए कन्सल्टंटला नेमले आहे. योजनेसाठी सुमारे २१० कोटी खर्च अपेक्षित आहे. देहू बंधाºयातून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाइपलाइनने पाणी आणण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे.डीआरए कन्सल्टंटची नेमणूकनिविदापूर्व कामांसाठी सल्लागारांनी ४८ लाख २६ हजार रुपयांचे दरपत्रक दिले आहे. नव्या समाविष्ट भागाची सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) किंमत सुमारे २१० कोटी आहे. त्यानुसार निविदापूर्व कामाची रक्कम डीपीआर रकमेच्या ०.२३ टक्के येत आहे. तसेच उर्वरित ६० टक्के भागामध्ये पाणीपुरवठा योजना राबविणे या कामासाठी पूर्वमान्य दर ३ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये इतका येत आहे. निविदापूर्व आणि निविदापश्चात कामासाठी एकत्रित किंमत ४ कोटी १३ लाख रुपये आहे. डीआरए कन्सल्टंटची या दोन्ही कामांसाठी नेमणूक करण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड