पिंपरी : पैशाचे आमिष दाखवून युगांडा देशातील महिलेकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात होता. या महिलेची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली. ही कारवाई गुरुवारी (दि.१७) सांगवी येथे करण्यात आली. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील पोलिस नाईक संगीता रामनाथ जाधव यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोन जणींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी महिला या पैशाच्या अमिषाने पीडित महिलेकडून सांगवीतील एका सोसायटीमधील प्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय करून घेत होत्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली. पीडित महिला युगांडा देशातील असून तिच्या व्हिसाची मुदत संपली असल्याचे पोलिसांना दिसून आले.