शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

स्वच्छतागृहांबाबत हवी जनजागृती व स्वयंशिस्त

By admin | Published: May 26, 2016 3:38 AM

‘लोकमत’ने सलग आठ दिवस स्वच्छतागृहांबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न प्रामुख्याने त्यामध्ये मांडण्यात आला होता. महिलांची होणारी कुचंबणा

‘लोकमत’ने सलग आठ दिवस स्वच्छतागृहांबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न प्रामुख्याने त्यामध्ये मांडण्यात आला होता. महिलांची होणारी कुचंबणा रोखण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. नागरिकांमध्येही जनजागृती होणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहे ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली, तरी स्वच्छतागृहांचा वापर कसा व्हायला हवा, याबाबत नागरिकांमध्ये स्वयंशिस्त हवी. जोपर्यंत नागरिकांमध्ये जनजागृती होणार नाही, तोपर्यंत शहराचा स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर राहणार आहे. भविष्यात नागरिकांना स्वच्छतागृहांबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. स्वत:च्या घरात ज्याप्रमाणे नागरिक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात, तशी जाणीव या सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी असायला हवी, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले. स्वच्छतागृहे अपुरी व अस्वच्छ आहेत, अशी कायम ओरड होत आहे. यावर तोडगा काय?स्वच्छतागृहांचा गतवर्षीचा निविदांचा कालावधी लवकरच संपत आहे. नवीन निविदेचे काम हाती घेतले आहे. क्षेत्रीयस्तरावर सध्या काम सुरू आहे. स्वच्छतागृहे आता यांत्रिक पद्धतीने साफ करण्याचा आमचा प्रस्ताव आहे. यासाठी मलजेट हे उपकरण वापरून स्वच्छतागृहांची साफसफाई ठेवली जाणार आहे.सार्वजनिक स्वच्छतागृहांतील दुर्गंधी थांबविण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात ?सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ ठेवणे जितके कर्मचाऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे, तितकेच झोपडपट्टी निवासधारकांचेदेखील आहे. या भागातील नागरिक स्वच्छतागृहे खूप घाण करतात. सर्व झोपडपट्टी भागात अशीच परिस्थिती आहे. सर्व ठिकाणी ड्रेनेज पाइपलाइन आहे. काही ठिकाणची ड्रेनेज या घाणीमुळेच तुंबलेली असतात. त्यावर सेफ्टी टँक पर्याय आहे. मात्र, शहरात पूर्णपणे ड्रेनेज पाइपलाइन आहे.महिला स्वच्छतागृहांची कमतरता आहे का?पुरुषांच्या तुलनेत महिला स्वच्छतागृहांची कमतरता नाही. महिला स्वच्छतागृहांची संख्या पुरुषांच्या स्वच्छतागृहांएवढीच आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत ती अपुरी आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांचा प्रस्ताव आहे. मात्र, जागेचा खूप मोठा प्रश्न आहे. यामुळे काही ठिकाणच्या स्वच्छतागृहांचे काम रखडलेले आहे.जनजागृती करण्यात येते का? स्वच्छतागृहांबाबत कायमच जनजागृतीचे काम सुरू असते. एप्रिल महिन्यातच स्वच्छतागृहांचा पंधरवडा राबविण्यात आला. त्यामध्ये ठिकठिकाणी फलक लावून जनजागृती करण्यात आली. यापुढे उघड्यावर स्वच्छतागृहास बसणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. आता कारवाई करणे आवश्यक आहे.