शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

पीयुसी चाचणीच ‘प्रदूषित’

By admin | Published: March 09, 2015 12:49 AM

वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणारी ‘पीयूसी’ (पोल्युशन अंडर कंट्रोल) केंद्रेच ‘प्रदूषित’ झाली आहेत.शहरातील वेगवेगळ्या चार पीयूसी केंद्रांवर

राजानंद मोरे, पुणेवाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणारी ‘पीयूसी’ (पोल्युशन अंडर कंट्रोल) केंद्रेच ‘प्रदूषित’ झाली आहेत.शहरातील वेगवेगळ्या चार पीयूसी केंद्रांवर अर्ध्या तासात एकाच दुचाकीची प्रदूषण चाचणी केली असता, कार्बन मोनोआॅक्साइड आणि हायड्रो कार्बनच्या प्रमाणात तफावत आढळून आली; तसेच एका केंद्रावर पीयूसी मशिनमधील रीडिंग न पाहताच प्रमाणपत्रावर नोंद करण्यात आली. एका केंद्रावर तर तीनचाकी व चारचाकींसाठी दिले जाणारे पीयूसी प्रमाणपत्र- दुचाकीसाठी देण्यात आले. त्यामुळे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी परवाने दिलेली ही केंद्रेच प्रदूषणास हातभार लावत असल्याचे चित्र आहे.वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरणातील प्रदूषण वाढत चालले आहे. या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २५० पेक्षा जास्त पीयूसी केंद्रांना परवाने दिले आहेत. दर सहा महिन्याला सर्व वाहनांना पीयूसी चाचणी करणे बंधनकारक आहे. वाहनांद्वारे होणारे प्रदूषण नियंत्रणात आहे किंवा नाही, यासाठी ही चाचणी केली जाते. त्यामध्ये कार्बन मोनोआॅक्साइड व हायड्रोकार्बन या विषारी वायूंचे प्रमाण तपासले जाते. त्यासाठी परिवहन कार्यालयामार्फत परवाने देण्यात आलेली पीयूसी केंद्रे शहरात ठिकठिकाणी अशाप्रकारची चाचणी करतात. मात्र, या चाचणीबाबत केंद्रचालकांनाच गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. याबाबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहरातील विविध ठिकाणच्या चार पीयूसी केंद्रांवर जाऊन दुचाकीची प्रदूषण चाचणी केली. साधारणत: अर्ध्या तासात ही चाचणी करण्यात आली. पण, चारही ठिकाणचे दोन्ही वायूंचे प्रमाण वेगवेगळे आले. सिंहगड रस्त्यावरील शेजारी-शेजारी असलेल्या दोन पेट्रोलपंपांवरील पीयूसी केंद्रांवर सुरुवातीला प्रदूषण चाचणी करण्यात आली. साधारण ५० मीटरही अंतर नसलेल्या या केंद्रांवर दोन्ही वायूंच्या प्रमाणात तफावत आढळून आली. पहिल्या पंपावर कार्बन मोनोआॅक्साइडचे प्रमाण ०.२ टक्के आले, तर दुसऱ्या केंद्रावर हे प्रमाण ०.३ टक्क्यांनी वाढले. हायड्रोकार्बनच्या प्रमाणातही दुसऱ्या केंद्रावर १८० पीपीएमची वाढ झाली. नवी पेठेतील तिसऱ्या केंद्रावर दोन्ही वायूंच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे आढळून आले.