पिंपरी : पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार असून, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास पालिकेने महामेट्रो रेल कॉपोर्रेशनला सांगितले आहे. निगडीपर्यंत मेट्रोसाठी सकारात्मक असल्याचे मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक, सामाजिक संस्था, संघटना यांच्या प्रयत्नाला यश येणार आहे. शहराची वाटचाल मेट्रो सिटीकडे सुरू आहे. केंद्र्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता महापालिका निवडणुकीपूर्वी गेल्या वर्षी पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली होती. पुणे महामेट्रोच्या वतीने हे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास मान्यता दिली होती. परंतु, पिंपरी ते निगडी या मार्गात अधिक अडचणी असल्याने अंतिम विकास आराखड्यामध्ये निगडीपर्यंतच्या मेट्रोचा समावेश झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोची पायाभरणी केल्यानंतर १० महिन्यांत शहरातील महामेट्रोने दापोडी ते पिंपरी या सव्वासात किलोमीटर अंतरादरम्यानचे काम वेगात सुरू केले.
सर्वपक्षीय प्रयत्नांना यशपुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्ष, विविध सामाजिक संस्थांनी आवज उठविला होता. मानवी साखळीही उभारली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील समग्र वाहतुकीच्या सोयीचा विचार करता व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता पुणे मेट्रोच्या पहिल्याच टप्प्यात निगडी-पिंपरी व पिंपरी-स्वारगेट या प्रकल्पाची सुरुवात करावी, अशी मागणी झाली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी मेट्रोचा खर्च करू, अशी तयारी दर्शविली होती. खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार यांनीही जोरदार मागणी केली होती. महापालिका जर खर्च करण्यास तयार असेल तर केंद्राच्या नगरविकास खात्यानेही हिरवा कंदील दाखविला होता.
महापालिकेचा खर्च नकोमेट्रो निगडीपर्यंत नेण्यास महापालिकेचा खर्च नको. महापालिका, राज्य आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे खासदार, आमदारांनी मेट्रोला निधी मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे. महापालिकेचा निधी वापरणार असतील, तर मेट्रोला विरोध असेल, अशीही भूमिका काही संस्थांनी घेतली आहे. त्यामुळे केंद्राकडून निधी आणण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर आहे.उद्योगनगरीत चिंचवड, आकुर्डी या भागात मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. मुंबईहून-पुण्याला जाताना निगडी हे शहराचे प्रवेशद्वार आहे. यामुळे, तसेच पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शहर वसले आहे. त्यामुळे चिंचवड, आकुर्डी, पिंपरी या परिसरातील बस आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी असते. पीएमपीचा निगडीत मुख्य बस डेपो आहे. त्यामुळे खऱ्या अथार्ने निगडीपर्यंत मेट्रोची आवश्यकता आहे. पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचा शहरवासीयांना काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची मागणी जोर धरत आहे.
महामेट्रोही अनुकूल, कासारवाडी ते मोशीही नवा मार्ग निगडीपर्यंतच्या मेट्रोचा खर्च महापालिका पेलणार आहे. मेट्रोने देखील पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची तयारी दर्शविली आहे. याला मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर डीपीआर बनविण्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या खचार्चा भार पेलण्यास पालिका सक्षम असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खर्च करण्यास महापालिका तयार असल्याने मेट्रोनेही यास दुजोरा दिला आहे, तर कासारवाडी ते मोशी या मागार्चाही डीपीआर करावा, अशा सूचना लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनास केल्या आहेत.