पिंपरी : पुणेमेट्रो ही पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात धावणार आहे. मात्र, या प्रकल्पाचे नाव पुणे मेट्रो केल्याने शहरात नाराजीचा सूर होता. त्याची दखल घेऊन अखेर, पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो असा नामकरणाचा ठराव महापालिका सभेने बुधवारी मंजुर केला आहे.
महापालिकेतील सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत आयुक्त कार्यालयात नुकतीच बैठक झाली. त्यात पिंपरी - चिंचवड - पुणे मेट्रो' नामकरणाचा प्रस्ताव महापौर उषा ढोरे यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, महापालिकेचा ठराव असल्यास महामेट्रोकडून कार्यवाही करणे सुलभ होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, स्थायी समितीने तसा ठराव मंजुर केला. या ठरावास विरोधी सदस्यांनीही तात्काळ सहमती दिली. दरम्यान, मोरवाडी चौकातील पिंपरी- चिंचवड महापालिका भवन मेट्रो स्टेशनला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर - पीसीएमसी पिंपरी मेट्रो स्टेशन नाव देण्याचा ठराव मंजुर.