शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

पुणेरी पाट्या प्रदर्शनास गर्दी; पिंपरीत ‘लोकमत’तर्फे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 1:01 AM

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, पुणेरी मिस्किलपणा शहरवासीयांनी अनुभवला.

पिंपरी : गणरायाच्या आगमनाने शहरातील वातावरण मंगलमय झाले असताना लोकमतच्या पुणेरी पाट्या या प्रदर्शनाची पिंपरीत आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, पुणेरी मिस्किलपणा शहरवासीयांनी अनुभवला.पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर चित्रपटगृहातील तळमजला येथे प्रदर्शन भरविण्यात आले असून, त्याचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले.या वेळी बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख हणमंत गायकवाड, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पी. के. इंटरनॅशनल ग्रुपचे प्रमुख जगन्नाथ काटे, उन्नती ग्रुपचे प्रमुख संजय भिसे, नगरसेवक तुषार कामठे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, संदीप ढेरंगे, दीपक नागरगोजे, विकास काटे आदी उपस्थित होते. उपक्रमाचे प्रायोजक फिनोलेक्स ग्रुप असून, खत्री बंधू, एचपी ज्वेलर्स आणि हमारा साथी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार हे होत.पुणेकरांच्या पुणेरी बाण्यासोबत मिश्किल पुणेरी पाट्या हीसुद्धा एक खासियत आहेच. या पाट्यांमधून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आम्ही खाण्याचे पैसे घेतो, अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही. एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये, चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते, अशा खवचट पुणेकरांच्या तैलबुद्धीला पिंपरी-चिंचवडकरांनी एकाच छताखाली पाहिले. पाट्या वाचून दालनात हास्याचे फवारे उडाले.सेल्फीसाठी लोटली गर्दीयेथे र्पाकिंग करू नये अन्यथा तुमच्या डोक्यातील आणि चाकातील दोन्ही हवा सोडण्यात येईल, तसेच येथे हापूसचे भाव फिक्स आहेत घासाघीस करू नये अन्यथा पायरी दाखविण्यात येईल, बाहेरच्या कोणीही लिफ्ट वापरू नये अडकल्यास सोसायटी जबाबदार राहणार नाही, अशा इशारावजा सूचना देणाऱ्या पाट्या लक्ष वेधून घेत होत्या.हास्याची लाट... टाळ्यांची दादअरे ही पाटी पहा किती छान आहे, जोरदार टोला लगावलाय, इथे तर नेमक्या शब्दांत सुनावले आहे, अशाप्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पुणेरी या पाट्या वाचताना प्रत्येकाच्या चेहºयावर हास्याची लकेर उमटत आहे. ‘हे वाचनालय पेपर वाचण्यासाठी आहे, डुलकी घेण्यासाठी नाही’, ‘येथे बिनडोक लोकांनी कचरा टाकावा’, ‘खाली येताना शक्यतो लिफ्टचा वापर टाळावा’,‘फोटो खराब आल्यास वडिलांना जाब विचारावा आम्हास नाही’, ‘फोन न लागल्यास कॉइन परत करावे’, पाट्या थोडक्यात लिहा, आपली व्यथा व्यक्त करु नका, अशा खोचक आणि नेमक्या शब्दांतील ‘पुणेरी पाट्या’ वाचताना हास्यकल्लोळ होतो.पुणेरी पाटी प्रदर्शन हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने शहर वासीयांना पुणेरी पाट्या प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहेत. जगभर प्रसिद्ध असणाºया पुणेरी पाट्यांमार्फत हे संदेश शहरवासीयांसाठी अनोखी भेट ठरेल. - संदीप पवार, युवा नेते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड