VIDEO | राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजूत काढूनही राहूल कलाटे अपक्ष लढण्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 01:23 PM2023-02-07T13:23:07+5:302023-02-07T13:25:58+5:30

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस...

Rahul Kalate is adamant about fighting as an independent even though the leaders of NCP have convinced him | VIDEO | राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजूत काढूनही राहूल कलाटे अपक्ष लढण्यावर ठाम

VIDEO | राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजूत काढूनही राहूल कलाटे अपक्ष लढण्यावर ठाम

googlenewsNext

पिंपरी : राष्ट्रवादी नेत्यांनी समजूत काढूनही राहूल कलाटे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. ते थोड्या वेळात चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याच्या शेवट्या दिवसापर्यंत मविआने उमेदवार जाहीर केला नव्हता. राष्ट्रवादीने अर्ज भरण्यासाठी काही तास उरले असताना नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. ही निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे राहूल कलाटेही इच्छूक होते. आता कलाटे थोड्याच वेळात निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत.

जर राहूल कलाटे यांनी याठिकाणी अर्ज भरला तर राष्ट्रवादीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मतविभागणी होऊन भाजपच्या उमेदवार आश्विनी जगताप यांना मतांमध्ये फायदा होऊ शकतो.

 काय म्हणाले राहुल कलाटे 

मला मागच्या वेळी १ लाखाहूनही अधिक मते मिळाली होती. २०१४, २०१९ ला मला असंख्य मते देऊन जनतेने माझ्यावरचा विश्वास दाखवला होता. मला त्याबाबत आत्मविश्वास होता. महाविकास आघडीकडे मी प्रमुख दावेदार होतो. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मागत होतो. परंतु काय झालं ते वरिष्ठच सांगतील. लक्ष्मण जगताप यांच्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. परंतु आघाडीने निवडणूक लढवणार असल्याचे ठरवल्यावर मी इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली होती.

Web Title: Rahul Kalate is adamant about fighting as an independent even though the leaders of NCP have convinced him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.