पिंपरी : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. तर, दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने चिंचवड येथे मंगळवारी (दि. ३) दुपारी ही कारवाई केली.शॉम्पा कौशिक घोष (वय ३४, रा. मारुंजी, ता. मुळशी), अभिजित शिंगोटे पाटील (रा. डांगे चौक, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार उषा दळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थरमॅक्स चौकाजवळ असलेल्या सिटी सृष्टी मसाज सेंटर होते. मसाज सेंटरच्या नावाखाली येथे आरोपी यांनी संगनमत करून तीन तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यासाठी तरुणींना ग्राहक मिळवून देण्याचे काम आरोपी करीत होते. त्यातून मिळणारी काही रक्कम स्वत:कडे ठेवून घेत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड तपास करीत आहेत.
चिंचवडला मसाज सेंटरवर छापा ; तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 18:17 IST
मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
चिंचवडला मसाज सेंटरवर छापा ; तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका
ठळक मुद्देमहिलेसह दोघांवर गुन्हा