पिंपरी : ढगाळ वातावरण, उकाडा, गारवा आणि ऊन असे दिवसभर वातावरण होते. रात्री गडगडाटासह पावसाने हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला. त्यामुळे रात्री वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे काही भागातील वीज खंडित झाली. पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. रविवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी ढगाळ वातावरण होते. काही काळ ऊन आणि परत काळे ढग असे दिवसभर संमिश्र वातावरण होते. काल शनिवारी रात्री एकच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह पावसाने तासभर हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांतील वीज खंडित झाली होती. आज दुसऱ्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गडगडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे रस्ते ओस पडले. काही सखल भागात पाणी साचले. काही वेळ हजेरी लावून पाऊस गेला. यामुळे काही भागातील वीज खंडित झाली होती. बाजारपेठेतील दुकानदार आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या आल्हादायक वातावरणात फिरण्याचा आनंद काहींनी लुटला. (प्रतिनिधी)महावितरण नॉट रिचेबलरात्रीच्या वेळी अचानक विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. काही सुज्ञ नागरिकांनी महावितरणच्या लँडलाईन नंबरची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो लागत नव्हता. याबाबत काही नागरिकांनी वरिष्ठांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनेक भागात शनिवारी रात्री विजपुरवठा नव्हता. या भागामध्ये असलेल्या रुग्णालयातील रुग्णांचीही गैरसोय झाली. महावितरणने विद्युततारा भूमिगत करणे गरजेचे आहे. परंतु, याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याने अशा समस्यांचा सामना शहरातील अनेक भागामध्ये कराव लागतो. या भागातील विद्युततारा भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे. काही भागामध्ये विद्युत पुरवठा कमी जास्त होत असल्याने विद्युत उपकरणे जळली असल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे. महावितरणने पावसाळ्यापूर्वी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.खंडित वीज पुरवठ्याने उडवली निगडीकरांची झोपनिगडी : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या निगडीकरांना पूर्वमौसमी पावसाने शनिवारी दिलासा दिला़ पण, पाऊस सुरू होताच जवळपास अर्ध्या निगडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांची झोप उडाली़ शनिवारी दिवसभर आकाश ढगाळ होते़ पाऊस येईल असे वाटत असताना आकाश निरभ्र होत असे़ हवेतील आर्द्रताही वाढल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता़ मध्यरात्री साडेबारानंतर काही भागात पावसाची एखादी सर येत होती़ नंतर दोनच्या सुमारास शहरात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली़ जसा पाऊस सुरु झाला त्याच वेळी अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला़ एका बाजूला पावसाचा आवाज आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने गाढ झोपेत असलेल्या शहरवासीयांना जाग आली़
शहरात गडगडाटासह पाऊस
By admin | Published: June 06, 2016 12:31 AM