रावेत : रक्षाबंधननिमित्त पर्यावरण रक्षणासाठी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, संवाद युवा प्रतिष्ठान, केदारेश्वर प्रतिष्ठान, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाडाभोवतीच्या लोखंडी जाळ्या काढून रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन वृक्षांना राखी बांधली. झाडांना राखी बांधत रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरिता कटीबद्ध असतो. त्याचप्रमाणे झाडाला राखी बांधून त्याची रक्षा व संगोपन करण्याची शपथ या वेळी घेण्यात आली. वृक्षारोपण करताना झाडांच्या सुरक्षतेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या वषोर्नुवर्षे झाडाभोवती तशाच राहतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. वाढ झालेल्या झाडाभोवतालची लोखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधून वाल्हेकरवाडी येथे आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. झाडांना या वेळी लोखंडी जाळ्यांच्या जोखडातून मुक्त करण्यात आले. वाल्हेकरवाडी येथील गावठाणातील झाडाभोवतालच्या जाळ्या काढल्या.प्रदीप वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, पंडित वाल्हेकर, कोंडीबा शिवले, अभिषेक वाल्हेकर, गणेश बोरा, सुयोग वाल्हेकर, गौतम बागुल, राहुल धनवे, प्रदीप पटेल, प्राजक्ता रुद्रवर, स्वाती वाल्हेकर, राजीव भावसार, अन्वर मुलाणी, रवींद्र कुंवर, माऊली जगताप, संतोष वाघ, किशोर तांगडे पाटील उपस्थित होते.झाडांचे आयुर्मान वाढण्यास मदतवृक्षांच्या खोडाभोवतीच्या जाळ्या झाडामध्ये रुततात. त्यामुळे झाडांच्या वाढीवर याचा परिणाम होतो. या जाळ्या काढल्याने झाडे आता मोकळा श्वास तर घेणार आहेत. त्यांचे आयुर्मान वाढण्यासही मदत होणार आहे.