लोणावळा : स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश रामचंद्र साळवे व त्यांचा पुतण्या किरण रतन साळवे यांना मावळ तालुक्यातून ५ ते २८ एप्रिल २०१७ असे २४ दिवस हद्दपार करण्यात आले असल्याचा आदेश मावळचे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी तीन एप्रिल रोजी पारित केला आहे.नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११च्या सुमारास कुसगाव हद्दीत शिंदे हॉस्पिटलजवळ ओळकाईवाडी येथे रमेश साळवे व किरण साळवे यांनी गैरकायदा मंडळी जमवून भांडण करुन फिर्यादीला हातातील हत्यारे व लाथा-बुक्क्यांनी मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ, दमदाटी केली. यामुळे कुसगाव हद्दीत सर्वसामान्यांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून भविष्यात भांडण-तंटा होण्याची दाट शक्यता असल्याने कुसगावात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून त्यांना पुढील २८ दिवसांकरिता मावळ तालुक्यातून हद्दपार करण्यात यावे,असा प्रस्ताव लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांनी सादर केला होता. (वार्ताहर)
मावळातून रमेश साळवे हद्दपार
By admin | Published: April 10, 2017 2:38 AM