शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

अनधिकृत बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 8:40 PM

अनधिकृत बांधकामाची महापालिकेकडे तक्रार केली असल्याचे सांगत ती तक्रार मागे घेण्यासाठी महिलेने पाच ते दहा लाखांची खंडणी मागितली. महिलेचे पैसे देऊन विषय संपवून टाक नाही, तर तुझे काही खरे नाही, अशी धमकी एकाने दिली. पिंपरी पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी : अनधिकृत बांधकामाची महापालिकेकडे तक्रार केली असल्याचे सांगत ती तक्रार मागे घेण्यासाठी महिलेने पाच ते दहा लाखांची खंडणी मागितली. महिलेचे पैसे देऊन विषय संपवून टाक नाही, तर तुझे काही खरे नाही, अशी धमकी एकाने दिली. पिंपरी पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश सुरेश सचदेव (वय ३५, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. संगीता शहा या महिलेसह एका ३२ वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तिच्या विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.आरोपी संगीता शहा हिने गिरीश सचदेव यांना फोन केला. तुमच्या अनधिकृत बांधकामाबाबत मी महापालिकेत तक्रार दिली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी पाच ते दहा लाख रुपये दे. तरच मी तक्रार मागे घेईन, अशी धमकी फोनवरून आरोपी शहा हिने सचदेव यांना दिली. एक अनोळखी व्यक्ती आठवड्यापूर्वी फिर्यादी सचदेव यांच्या पिंपरीतील दुकानात आला. ‘तू संगीता शहा यांचे पैसे देऊन विषय संपवून टाक. नाही तर तुझे काही खरे नाही’, अशी धमकी फिर्यादी सचदेव यांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस