पिंपरी : महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? याबाबत अनिश्चितता असली तरी, विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या निमित्ताने शहरातील विविध भागांत रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने विविध परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर इव्हेंट आणि अभिनेते आणि सिनेतारका सहभागी होणार आहेत. रावण दहनाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांचे, इच्छुकांचे मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन होणार आहे.
लोकसभा, विधानसभा पुढील काही महिन्यांत होणार असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक ही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष अशा विविध पक्षांमधील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, सांगवी, संभाजीनगर, पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर अशा विविध भागांत विजयादशमी सोहळ्याचे आयोजन केले आहे. राजकीय नेत्यांनी शक्तिप्रदर्शन घडविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे दसऱ्यानिमित्त आयोजन केले आहे.
पिंपरी रावण दहन
पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणावर संदीप भाऊ वाघेरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याठिकाणी सत्तर फूट रावण उभारण्यात येणार आहे. यावेळी आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे उपस्थित आहेत, अशी माहिती संयोजक माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.
पिंपळे सौदागरला १२० फूट उंचीचा रावण
विजयादशमी निमित्ताने नगरसेवक शत्रुघ्न काटे यूथ फाउंडेशनच्या सौजन्याने पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक,नेक्सा शोरूम समोर रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा १२० फूट उंचीचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात येणार आहे. कार्यक्रमास सुनील -अनिल तिलकधारी, हिसार हे या उत्सवाचा भाग होण्यासाठी हरयाणातून प्रवास करून येणार आहेत. अभिनेत्री हृता दुर्गुळे, अभिनेत्री अक्षया देवधर, प्रवीण तरडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक अशी माहिती संयोजक भाजपचे नेते शत्रुघ्न काटे यांनी दिली.