पिंपरी - रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बंधा-याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्याची पाण्याची पातळी तपासण्यात येणार असून, त्यासाठी थेट पद्धतीने काम दिले जाणार असून, ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार असून, साडेपाच लाख रुपये खर्च केला जाणार आहे.पवना नदीवरील रावेत येथील बंधारा तत्कालीन लोकसंख्येनुसार पाणीवापर, तसेच भविष्यात होणारी लोकसंख्यावाढ लक्षात घेऊन बांधला होता. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकांत महापालिका हद्दीत प्रचंड गतीने विकास होत आहे. लोकसंख्यावाढ कमी कालावधीत प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून येते. रावेत बंधाºयाजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. रावेत येथील बंधाºयातून महापालिका ४८० एमएलडी, एमआयडीसी १२० एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ३० एमएलडी उपसा करते. बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या बंधाºयाची देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येते. हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने साठवणूक क्षमता कमी असल्याचे पाटंबधारे विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. या संदर्भात महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांची बैठक झाली. रावेत बंधाºयाच्या वरील बाजूस नदीपात्रासमोर ही योजना आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी या बैठकीत सांगितले. पाणलोट क्षेत्राचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे केले जाणार आहे. या सर्वेक्षणात बंधाºयाची उंची वाढविणे, खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे.पाणीपुरवठा विभाग : उधळपट्टीकडे दुर्लक्षनिविदा न काढता सर्वांत कमी दर सादर केलेल्या ठेकेदाराला काम देण्याचे ठरविले असून, त्यानुसार ५ लाख ५० हजार रुपये हा लघुतम दर सादर करणाºया राहुल देशमुख यांना निविदा न मागविता करारनामा करून थेट पद्धतीने काम देण्यात येणार आहे. अंदाजपत्रकातील ‘पाणीपुरवठा विशेष योजना निधी’ या लेखाशीर्षांतर्गत रावेत येथील जुन्या बंधाºयाच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधणे या कामांतर्गत पाच लाख खर्च करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.
रावेत बंधारा ड्रोन सर्वेक्षणाचे पाच लाखांचे काम निविदेविना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 1:58 AM