पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, तसेच इंडियन बॉडी बिल्डिंंग फेडरेशन यांच्या मान्यतेने सांगवी येथे महापौर चषक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०१७ आयोजित करण्यास व त्यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास, तसेच घरकुलातील आरक्षण विकासास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.स्थायी समिती सभागृहातील सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. चिखली से. क्र. १७ व १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या गृहप्रकल्पामध्ये विविध आरक्षणे विकसित करण्यासाठी येणाºया सुमारे ७६ लाख ५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यांपैकी महापालिकेच्या नि:समर्थ (अपंग) कल्याणकारी योजनेअन्वये मनपा हद्दीतील अपंग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य देण्यात येते.त्यानुसार दोन पात्र लाभार्थींना देण्यात येणाºया सुमारे दोन लाखांच्या अर्थसाहाय्यास मान्यता दिली. महानगरपालिका जलशुद्धीकरण केंद्र से. क्र. २३ येथे जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी द्रवरूप स्वरूपातील पॉली अॅल्युमिनियम क्लोराइड व पावडर स्वरूपातील पॉली अॅल्युमिनियम क्लोराइड पुरविण्यासाठी ४६ लाख १६ हजार रुपायांच्या खर्चास, प्रभाग क्र. ३४ गव्हाणेवस्ती येथे मनपा इमारतीची सुधारणा करण्यासाठी येणाºया सुमारे ३१ लाख ८६ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.चिखली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत ताम्हाणेवस्ती परिसरातील जुन्या जलनि:सारण नलिका बदलणे व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी येणाºया सुमारे ३३ लाख ३५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. फुगेवाडी पंपिंग स्टेशन अंतर्गत येणाºया जुन्या मलनि:सारण नलिका आवश्यक त्या ठिकाणी बदलण्यासाठी येणाºया सुमारे ३६ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.प्रभाग १८ मध्ये फुटपाथसाठी ३३ लाखप्रभाग क्र. १८ मध्ये फुटपाथची कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३३ लाख रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. २५ मध्ये फुटपाथची कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३१ लाख ४७ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. २४ मध्ये फुटपाथची कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३० लाख ३१ हजार रुपयांच्या खर्चास, आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत से. क्र. २२ परिसरातील जुन्या जलनि:सारण नलिका बदलणे व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी येणाºया सुमारे ३१ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. चºहोली व चिखली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत शेलारवस्ती, पाटीलनगर, धर्मराजनगर परिसरातीलजुन्या जलनि:सारण नलिका बदलणे व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी येणाºया सुमारे ३५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.
आरक्षणे विकसित करणार, सांगवीत होणा-या शरीरसौष्ठव स्पर्धा खर्चास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 1:24 AM