लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातून लाल छातीचा पोपट हा पक्षी दिसेनासा झाला आहे. याबाबत पक्षीप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.हिमालय पायथ्याशी असलेला मूळ अधिवास सोडल्यास भारतातील इतर राज्यांमध्येही आजपर्यंत लाल छातीचा पोपट दिसल्याची एकही नोंद नाही. अगदी भटका पक्षी म्हणूनही नाही. हा पक्षी हिमालय पायथ्याच्याच जंगलात कायम स्वरुपी वास्तव्यास असून हा तिथलाच स्थानिक रहिवासी पक्षी आहे. आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात पक्ष्यांच्या अभ्यासासाठी आयुष्य घालवणारे पक्षीतज्ञ डॉ. सालिम अली यांनीही पक्षाच्या वास्तव्य फक्त उत्तराखंड, इशान्य भारतातील सिक्किम, अरूणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणीपूरच्या हिमालय पायथ्याच्या जंगलातच असल्याचे नोंदवले आहे. हा पोपट नेहमी ६ ते १० च्या समूहातच राहतो. हा पक्षी कधीही ॠतुनुसार स्थलांतर करत नाही. त्यामुळे शास्त्रीय भाषेत याला अर्थात गतिहीन जीवन जगणारा पक्षी म्हणतात. हा पक्षी पुण्यात, मुंबईतच काय तर त्याचा अधिवास सोडून इतरत्र कोठेही दिसणे ही मोठी चिंताजनक बाब आहे. याची संख्या झपाट्याने कमी होत असून इंटरनेशनल युनियन फोर कोन्झर्वेशन आॅफ नेचर(आईयुसीएन) संस्थेच्या रेड डॅटा लिस्टमधे नोव्हेंबर २०१३ मध्ये या पक्षाची स्थिती धोक्याजवळ असा उल्लेख केला होता. पुण्यातील नवी पेठ परिसरात पक्षी अभ्यासक आणि वन्यजीव छायाचित्रकार मिलिंद हळबे यांना लाल छातीचा पोपट दिसला होता. तसेच कुलाबा येथेही पक्षीतज्ञ डॉ. राजु कसंबे एक लाल छातीचा पोपट दिसल्याची नोंद आहे. या आधी महाराष्ट्रात एकही पक्षी दिसल्याची नोंद नाही व त्यानंतरही मुंबई व अन्यत्र कुठेही दिसल्याची नोंद नाही.महाराष्ट्रात अनेक पक्षीतज्ञ व पक्षी अभ्यासक तसेच या विषयी कार्यरत अनेक संस्थाही आहेत. परंतु यापैकी कुणालाही या पक्षाचा मूळ अधिवास सोडून इथे कसा आला असा प्रश्न पडला नाही या गोष्टीची खंत वाटते.- उमेश वाघेला, अलाईव्ह संस्थेचे अध्यक्ष, पक्षी अभ्यासक खरं तर अभ्यासकांनी, संस्थांनी या घटनेवर आक्षेप घेऊन पक्षाच्या स्थलांतराचे गुपित शोधण्याचे काम सुरु केले असते, तर निसर्ग संवर्धनाला अर्थ राहिला असता.- प्रशांत पिंपळनेरकर, पक्षी निरिक्षक
लाल छातीच्या पोपटाचे दर्शन झाले दुर्मिळ
By admin | Published: July 03, 2017 3:12 AM