पिंपरी : आरपीआयचे (आठवले गट) जे उमेदवार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यावर आरपीआयच्या नेत्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे, असे आरपीआयच्या शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. या निवेदनानंतर निलंबनाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. आरपीआयच्या प्रदेश कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे अधिकार शहरातील नेत्यांना कोणी दिले, असा मुद्दा भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या आरपीआयचे पदाधिकारी असलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे. आरपीआय आणि भाजपाची युती जागावाटपावरून फिसकटली. उमेदवारीअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीयादी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे घोळ झाला. काहींच्या अर्जाला भाजपाचा ए बी फॉर्म जोडला गेला. परंतु हा मुद्दा आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादंग निर्माण करण्यास कळीचा मुद्दा बनला आहे. भाजपाच्याचिन्हावर जे निवडणूक लढणारआहेत. त्यांनी पक्षांच्या नेत्यांचा फोटो वापरू नये, अशी तंबी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
‘आरपीआय’मध्ये निलंबनावरून कलगीतुरा
By admin | Published: February 11, 2017 2:25 AM