पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त झालेल्या, तसेच स्वेच्छानिवृत्त एकूण २१ अधिकारी व कर्मचाºयांचा आज सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सेवाउपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करून सन्मान करण्यात आला.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कामगार कल्याण अधिकारी अनिल जगदाळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, मुख्य आरोग्य निरीक्षक प्रभाकर तावरे, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी चारुशीला जोशी, मनोज माछरे, नाथा मातेरे आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये कार्यालयीन अधीक्षक विद्या कुलकर्णी, शंकर जाधव, लेखापाल सुनीता चांदवणकर, फार्मासिस्ट वसंत साळी, ए. एन. एम. अंजली ठिगळे, सहायक शिक्षक हिम्मत चव्हाण, उपशिक्षिका कालिंदी पवार, लिपिक दामू चंदनशिवे, मीनाक्षी कुंभारे, वाहनचालक नारायण गिरी, शिपाई कल्पना लांडगे, आरोग्य कर्मचारी शालूबाई साबळे, पोपट खुडे यांचा समावेश आहे.
स्वेच्छानिवृत्तांमध्ये मुख्य लिपिक विनायक पतकी, वीजतंत्री नारायण बनसोडे, आरोग्य कर्मचारी रमेश काशिद, आशा मोरे, लता गवारे, नंदा केदारे, शशिकला थोरात, अलका भुजबळ यांचा समावेश आहे.