पिंपरी : शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मोठा वाव मिळाला. तसेच क्रीडा स्पर्धेमध्येही विद्यार्थ्यांनी यश मिळविले. काही शाळांनी नाताळनिमित्त विविध कार्यक्रम घेतले. या कार्यक्रमाला पालकही उपस्थित होते.
रावेत : जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय नाट्य स्पर्धेत किड्स वर्ल्ड विद्यालय, प्राधिकरण, अजमेरा हायस्कूल यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय नाट्य स्पर्धा निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय येथे झाल्या. सलग दोन दिवस चाललेल्या या केंद्रावर पिंपरी- चिंचवड परिसरातील माध्यमिक (हिंदी विभाग) १६ नाटिका माध्यमिक (इंग्रजी विभाग) ०६ नाटिका आणि प्राथमिक शाळा (मराठी विभाग) २१ अशा एकूण ४३ शाळांनी सहभाग नोंदविला.
माध्यमिक विभाग हिंदी नाटिका(मुली) : किड्स वर्ल्ड विद्यालय, प्राधिकरण (सावित्री का वृत्त, प्रथम), न्यू इंग्लिश स्कूल,चिंचवड (खून कीहोली, द्वितीय)
हिंदी नाटिका (मुले) : अजमेरा हायस्कूल (इमानदारी प्रथम), इंग्रजी नाटिका (मुले) : सरस्वती विद्यालय, आकुर्डी (व्हाय वुई शूड लर्न मॅथेमॅटिक्स, प्रथम), उत्कृष्ट दिग्दर्शन : संगीता कुलकर्णी (प्रथम), नीलिम कांबळे(द्वितीय), उत्कृष्ट अभिनय हिंदी (मुली): मैत्रेय नायगावकर (जोतिबा फुले, प्रथम), साक्षी जोशी (सावित्री, द्वितीय), सोनाली बाबर (सर्जेराव, तृतीय). हिंदी (मुले) : देवांग डे (भिकारी, प्रथम), इंग्रजी (मुले) : अभिनंदन गायकवाड (सोनू, प्रथम), यशवंत गुप्ता (लालुचंद, द्वितीय). प्राथमिक विभाग : मराठी नाटिका (मुले) बांठिया प्राथमिक जैन विद्यामंदिर,चिंचवड (पण निवड चुकली, प्रथम), सीएमएस इंग्लिश मीडिअम, निगडी (मी घाबरत नाही, द्वितीय), नूतन विद्यामंदिर, कृष्णानगर (असा कसा मी चौकटीतील राजा, तृतीय). मराठी नाटिका (मुली) : भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय, पिंपरी (रंग माझा वेगळा, प्रथम), प्रज्ञान प्रबोधिनी इंग्लिश स्कूल ,चिखली (अभ्यासाचा वग, द्वितीय), विद्या विनय निकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल,पिंपळे निलाख (रंगाची दुनिया, तृतीय) उत्कृष्ट दिग्दर्शन : मराठी विभाग(मुले): अपर्णा धुमाळ (प्रथम), दुर्गा चव्हाण (द्वितीय), वनिता सस्ते (तृतीय). उत्कृष्ट दिग्दर्शन (मुली): विलास गुंजाळ (प्रथम) , नेहा कुलकर्णी (द्वितीय), कल्पना गजरे (तृतीय). उत्कृष्ट अभिनय (मुले): यशराज जगताप (गुरुजी,प्रथम), मोहित वाघ (विद्यार्थी,द्वितीय). उत्कृष्ट अभिनय (मुली) : शर्वरी कारेकर (आई, प्रथम), अनुष्का काकडे(शिक्षिका, द्वितीय), समीक्षा सुरडकर (पेंद्या, तृतीय)
प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक कामथे, समाधान सुसर, शरयू निकम यांनी संयोजन केले. उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून किरण सरवदे, भीमराव अडसूळ, गणेशदेव सोन्नर यांनी काम पाहिले.