शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

मेट्रो करणार ‘त्या’ वृक्षांचे पुनर्रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 3:08 AM

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सध्या महामेट्रोच्या वतीने मेट्रो प्रकल्पांच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना प्रकल्पाच्या मार्गात अनेक वृक्षांचे अडथळे येत आहेत. सदर वृक्षांचे पुनर्रोपण ही संपूर्णत: महामेट्रोची जबाबदारी असून, या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सध्या महामेट्रोच्या वतीने मेट्रो प्रकल्पांच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना प्रकल्पाच्या मार्गात अनेक वृक्षांचे अडथळे येत आहेत. सदर वृक्षांचे पुनर्रोपण ही संपूर्णत: महामेट्रोची जबाबदारी असून, या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे जागतिक पातळीवर सर्वमान्य असलेल्या पद्धतीनुसार हे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या पद्धतीने पुनर्रोपण केल्यास वृक्षांचा तग धरण्याचा दर हा सर्वाधिक असल्याने महामेट्रो ही पद्धत अवलंबित आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.या पद्धतीनुसार पिंपरी येथील वल्लभनगर एसटी स्टॅण्डमागे असलेल्या सहयोग केंद्राच्या आवारात वरील पद्धतीने पहिल्या दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून निगडीपर्यंत मेट्रो मार्गिका न्यावी जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना मेट्रोचा फायदा होईल, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत आहे. ही मागणी लक्षात घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आवश्यक डीपीआर बनविण्याची विनंती महामेट्रोकडे केली आहे.अशी होणारपिंपरीतील मेट्रोसध्या भोसरी (नाशिक फाटा ते खराळवाडी) आणि सीएमई ते मेगामार्ट या दोन ठिकाणी पिंपरी-चिंचवडच्या मेट्रोचे काम सुरू आहे. आतापर्यंत संपूर्णपणे ४ खांब उभारले आहेत. पीअर कॅप शिवाय ११ खांब उभारले आहेत. ४८ खांबांचा पाया रचला आहे. हॅरिस ब्रीज येथील काम ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पावसाळ्यापूर्वी ३० जून २०१८ पर्यंत तेथील सबस्ट्रक्चर पूर्ण होईल. याशिवाय मेट्रोसाठी आवश्यक ४१ सेगमेंट देखील तयार असून, व्हायाडक्टचा पहिला स्पॅन हा अंदाजे २६ डिसेंबरपर्यंत तयार होईल, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड