शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पळवून नेलेल्या डॉक्टरची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:16 AM

चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून डॉकटरला मोटारीसह दोघांनी मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चरोली येथून पळवून नेले.

पिंपरी : चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून डॉक्टरला मोटारीसह दोघांनी मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चरोली येथून पळवून नेले. पोलीस शोध घेत असतानाच डॉक्टर सोलापूर रोडवरील केडगाव चोफुला येथे असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली .डॉ. शिवाजी पडवळ असे पळवून नेलेल्या डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आळंदी जवळील मरकळ येथील राठी पोलिबॉड कंपनीचे पडवळ हे संचालक आहेत. ते मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोटारीतून कंपनीचा चालक जितेंद्र भुजंग यांच्यासह चारहोली बुद्रुक येथील दाभाडे वस्ती मार्गे वडगाव धायरी येथे घरी जात होते. त्यावेळी दभादेवस्ती येथे रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी पडवळ यांच्या मोटारीला आडवी लावली. त्यानंतर 'तू आमच्या दुचाकीला कट का मारला' असे म्हणत आरोपींनी मोटारचालक भुजंग यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याना मोटारीतून बाहेर घेतले. त्यानंतर पडवळ यांना मोटारीसह पळवून नेले. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.चार टीम तयार करून शहरात नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान एक टीम केडगाव चैअफूला येथे शोध घेत असताना पडवळ हे पंजाबी ढाबा येथे असल्याचे त्यांचे भाऊ यांना फोनवरून समजले. त्यानंतर तेथे जाऊन पोलिसांनी पडवळ यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Kidnappingअपहरण