शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
4
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
5
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
6
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
7
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
8
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
9
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
10
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
11
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
12
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
13
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
14
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
15
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
16
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
17
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
18
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
19
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
20
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

आरक्षणामुळे इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले

By admin | Published: January 24, 2017 1:41 AM

नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गट हा औद्योगिक नगरीत असल्याने येथील गणात चुरशीची लढत होणार आहे. गटात अनुसूचित जमातीचे

चाकण : नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गट हा औद्योगिक नगरीत असल्याने येथील गणात चुरशीची लढत होणार आहे. गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण पडल्याने सर्वसाधारण इच्छुकांच्या आशा मावळल्या आहेत. शिवसेना वगळता इतर पक्षांवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. नाणेकरवाडी गणात ओबीसी महिला व महाळुंगे गणात ओबीसी पुरुष आरक्षण असल्याने इच्छुक उमेदवारांनी कुणबी दाखले काढून जात पडताळणीसाठी धाव घेतली आहे. या जिल्हा परिषद गटातून यापूर्वी विद्यमान आमदार सुरेश गोरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोनदा व मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर किरण मांजरे हे निवडून गेले आहेत. गोरे सध्या शिवसेनेच्या गोटात असल्याने हा गड कोण राखणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या मानसुब्यांवर पाणी पडले आहे. आरक्षण पडल्याने वरच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी खालच्या उमेदवारांवर आली आहे. काही पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्तात ठेवले असून, अंतिम टप्प्यात नावे जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिनाभर आधी प्रचार करूनही अंतिम क्षणी उमेदवारी बदलल्यास केलेल्या कष्टांवर पाणी पडणार आहे.चाकणला नगर परिषद स्थापन झाल्याने या वेळी चाकण वगळून जिल्हा परिषद गट तयार झाला असून गणातील गावे विभागली आहेत. नाणेकरवाडी पंचायत समिती गणात ओबीसी महिलेचे आरक्षण असून, त्यात नाणेकरवाडी, मेदनकरवाडी व कडाचीवाडी यांचा समावेश आहे. तर, महाळुंगे इंगळे गणात ओबीसी पुरुषाचे आरक्षण असून, त्यात खराबवाडी, महाळुंगे, खालूंब्रे, येलवाडी, सांगुर्डी व कान्हेवाडी तर्फे चाकण या गावांचा समावेश आहे.या गटात शिवसेनेकडून नाणेकरवाडी येथील रूपाली श्रीकांत कड या तुल्यबळ दावेदार आहेत. भाजपाकडे या जागेसाठी कुणाच्याही नावाची चर्चा नाही. महाळुंगे येथील माजी सरपंच दत्ता गिरे हे इच्छुक असून, त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी हवी आहे. नाणेकरवाडी पंचायत समिती गणामध्ये ओबीसी महिलेचे आरक्षण आहे.या गणात राष्ट्रवादीच्या वैशाली गणेश जाधव यांना शिवसेनेने खेचून आणले आहे. राष्ट्रवादीकडून सपना बलराम मेदनकर, अनुराधा सुभाष भुजबळ इच्छुक आहेत. दीपा संतोष नाणेकर, अश्विनी अंकुश नाणेकर याही इच्छुक आहेत. सुरेखा रामदास मेदनकर या भाजपाकडून इच्छुक आहेत. (वार्ताहर)