कामशेत : कान्हे फाटा येथील साईबाबा सेवाधाममधील एस. ई. सी. सेंटर अस्थिव्यंग शाळेतील सेवामुक्त सहा कर्मचाऱ्यांना संस्थेने पूर्ववतपणे रुजू करून घेतले आहे.यामुळे महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्या आंदोलनास यश आले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी दिलीे. एस. ई. सी. सेंटर आग्रीपाडा, मुंबई या संस्थेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा सहा कर्मचाऱ्यांना १ आॅगस्टपासून आर्थिक कारण पुढे करीत सेवामुक्त केले होते. महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने हरकत घेऊन आमरण उपोषणाचा निर्णय घेताच संस्थेने संघटनेबरोबर ११ आॅगस्ट रोजी कान्हे फाटा व १ आॅक्टोबर रोजी आग्रीपाडा, मुंबई येथील कार्यालयात सहविचार सभा घेतली. सभेत कर्मचाऱ्यांना पूर्ववतपणे सेवेत रुजू करून न घेतल्यास संस्थेच्या विरोधात पुणे व मुंबई येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला. त्यानंतर संस्थेने कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचा निर्णय दिला. (वार्ताहर)
सेवामुक्त कर्मचारी झाले पुन्हा रुजू
By admin | Published: October 06, 2016 3:09 AM