शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

77 किलोमीटर सायकलिंग करत साजरा केला 77वा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 2:50 AM

तरुणांपुढे ठेवला आदर्श; निवृत्त सैनिकाने वाढदिवसानिमित्ताने संकल्प केला पूर्ण

पिंपरी : प्रत्येक व्यक्तीसाठी आपला वाढदिवस विशेष असतो. या दिवशी वेगळे काही करण्याचा प्रत्येकाचा ध्यास असतो. त्यासाठी कोणी अनाथाश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा करतात, तर कोणी पर्यावरण रक्षणासाठी झाडांची लागवड करतात. निवृत्त सैनिक असलेल्या पिंपरीतील ७७ वर्षांच्या आजोबांनी आपला वाढदिवस ७७ किलोमीटर सायकल चालवून अनोख्या पद्धतीने मंगळवारी साजरा केला. अरविंद दीक्षित असे त्यांचे नाव आहे.बदलत्या जीवनशैलीमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. पहाटे फिरायला जाणे, पोहणे, सायकलिंग करणे असे छंद जोपासले जातात. दीक्षित हे अभियंता असून, त्यांनी १४ वर्षे इंडियन नेव्हीमध्ये नोकरी केली. त्यानंतर २५ वर्षे दिल्ली विद्यापीठात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम केले. नाट्य, भाषांतर, वाचन, लेखन याचा त्यांना छंद आहे. नियमितपणे सायकलिंग करणाऱ्या दीक्षित यांनी वाढदिनी ७७ किमी सायकल चालवून तरुणांपुढे व्यायामाचा आदर्श ठेवला आहे.प्राची परांजपे, मुक्ता जोशी, सचिन चित्तापुरे, नचिकेत कुंटे, पराग काटदरे, सुनील ननावरे, सुनील पाटील या सात जणांनीही दीक्षित यांच्यासह ७७ किलोमीटर सायकल चालवून साथ दिली. ७७ व्या वर्षी ७७ किलोमीटर सायकल चालवून आजच्या तरुण पिढीपुढे त्यांनी वेगळा आदर्श ठेवला आहे. त्याचप्रमाणे आजचे तरुण जे रात्री-अपरात्री हुल्लडबाजी करत, पैशांचे प्रदर्शन करत, मोठमोठे अनधिकृत फ्लेक्स उभे करून वाढदिवस साजरा करतात, त्यांना चपराकच मारली आहे.मला हे करायचे आहे, असे आपण एकदा ठरवले आणि त्यानुसार मेहनत, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली, तर आपण ती गोष्ट सहज साध्य करू शकतो. यामध्ये वयाचा संबंध येत नाही. मी ठरविले होते, की मला ७७ किलोमीटर सायकल चालवायची आहे आणि ते मी केले. सायकल चालविणे हे आरोग्यासाठी फायद्याचेच आहे. आजच्या तरुणांनी यापासून बोध घेऊन कोणाला काही हानी पोहचणार नाही, अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करावा. - अरविंद दीक्षितपिंपरीतील मासूळकर कॉलनी येथील रहिवासी अरविंद दीक्षित यांनी ७७ व्या वर्षी ७७ किलोमीटर सायकल चालवून एक अनोखी प्रेरणा समाजापुढे ठेवली आहे. यासाठी ते महिनाभर सराव करीत होते. ७७ किलोमीटरचा हा टप्पा त्यांनी अवघ्या सहा तासांत पार पाडला. पहाटे सव्वापाच ते सकाळी सव्वाअकरा या वेळेत त्यांनी ७७ किलोमीटर सायकल चालवली.मासूळकर कॉलनी, रसरंग चौक, अंतरिक्ष चौक, अण्णासाहेब मगर स्टेडिअम, यशवंतनगर, टेल्को कंपनी, केएसबी चौक, आयुक्त बंगला, मोरवाडी कोर्ट, लालटोपीनगर, सम्राट चौक, देऊबाई कापसे उद्यान व तेथून पुन्हा मासूळकर कॉलनीतील दत्त मंदिर याप्रमाणे १२ फे ºया मारल्या.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड