पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने एकूण ११ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना आज साहित्याचे वाटप करुन मतदान केंद्रावर पथक रवाना झाले असून, दरम्यान आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शहरातील काही मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी दिली.निवडणुकीसाठी एकूण १६०८ मतदान केंद्रे निश्चित केली असून, एकूण ५०५३ बॅलेट युनिट व १७७२ कंट्रोल युनिटचा वापर करण्यात येणार आहे. तसेच याकामी एकूण ८९२५ कर्मचारी व १७८५ पोलीस कर्मचारी अशा एकूण १०,७१० कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे १ पथक नियुक्त करण्यात आले असून, यात १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई व १ पोलीस कर्मचारी अशा ६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
आयुक्तांनी घेतला आढावा
By admin | Published: February 21, 2017 2:59 AM