लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यंदापासून बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये अर्थसाह्य करण्यात येणार आहे. दहावीमध्ये ८० ते ९० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार आणि ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसाधारण सभेत याला मंजुरी देण्यात आली. नागरवस्ती विभागामार्फेत शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून अर्थसाहाय्य करण्यात येते. त्यानुसार, महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना बक्षिसाची दहा ते पंधरा हजार रुपयांची रक्कम देण्यात येते. यापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के गुण प्राप्त केल्यास १० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येत होते. आता ८० ते ९० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. ९० टक्क्ययांहून अधिक गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये अर्थसाह्य करण्यात येणार आहेत. यापूर्वी ८५ टक्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देण्यात येत होते.
दहावी, बारावीच्या गुणवंतांना बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 4:25 AM