प्रज्ञा केळकर-सिंग/ लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तरुणांमध्येही तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण वाढले असून त्यामुळे लैैंगिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवला आहे. तंबाखूच्या सततच्या सेवनामुळे नपुंसकत्व तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. व्यसनांध तरुणांमध्ये नपुंसकत्वाचे प्रमाण ५०-६० टक्क्यांच्यादरम्यान वाढले आहे.तंबाखूच्या सेवनामुळे दररोज १० हजार लोक मृत्यूच्या दाढेत ढकलले जातात. तंबाखूमुळे तोंडाचा, फुफ्फुस, जीभ, अन्ननलिकेचा कर्करोग उद्भवतो. पूर्वी हा कर्करोग वयाच्या चाळिशीनंतर डोकावू लागायचा. आता, कर्करोगतज्ज्ञांकडे येणाऱ्या तरुणांची वयोमर्यादा तिशीपर्यंत खाली आली आहे. कर्करोगाप्रमाणेच तंबाखूच्या सेवनामुळे लैैंगिक समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे वंध्यत्व तसेच नपुंसकत्वाच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते, असे निरीक्षण डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, ‘बऱ्याच तरुणांना दररोज तंबाखूच्या ८-१० पुड्या खाण्याची सवय असते. असे बरेचसे रुग्ण नियमितपणे उपचारांसाठी येतात. या तरुणांमध्ये लैैंगिक समस्या मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र, आपल्याकडे पुरुष अजूनही लैैंगिक समस्यांबाबत मोकळेपणाने बोलत नाहीत. डॉक्टरांचा वेळीच सल्ला न घेतल्यास या समस्या दीर्घकालीन रुप धारण करू शकतात.’ तंबाखूच्या सेवनामुळे रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होतो. रक्तवाहिन्यांचा आकार कमी झाल्याने रक्तप्रवाहावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाबही मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यातून उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका संभवतो. तंबाखूमध्ये निकोटिन, अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन, नायट्रासॅमीन आदी रसायने असतात. तंबाखूसेवनाने रासायनिक प्रक्रिया होत असल्याने त्याचा शरीरावर थेट विपरित परिणाम होतो. व्यसनाचा परिणाम थेट रक्तवाहिन्यांवर होत असल्याने लैैंगिक समस्या निर्माण होतात. अशा वेळी, समुपदेशन, सेक्सथेरपी, औैषधोपचार या माध्यमातून लैैंगिक समस्यांवर उपचार करण्याबरोबरच डॉक्टरांकडून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केले जातात.तंबाखूमध्ये निकोटिनचा समावेश असल्याने त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. रक्तवाहिन्या लहान झाल्याने रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार उद्भवतात. यामध्ये लैैंगिक समस्यांचाही समावेश असतो. तंबाखूच्या सेवनामुळे लिंग ताठ न होण्याचे प्रमाण १५-२० टक्के, शीघ्र वीर्यपतनाचे प्रमाण २० टक्के, लैैंगिक आकर्षण कमी होणे, इच्छा न होणे, लैैंगिक अध:पतन, लैैंगिक क्रियेवर परिणाम होणे अशा समस्या उद्भवतात. अशा रुग्णांना औैषधोपचार, समुपदेशन, सेक्स थेरपीबरोबरच व्यसनमुक्तीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाते.- डॉ. नीलेश नाफडे, लैैंगिकतज्ज्ञबिडी वळण्याचे काम करणाऱ्या महिला कर्मचारी, तंबाखू, गुटखा आदींचे व्यसन असणाऱ्या महिलांमध्ये अनेक विकार उद्भवतात. त्यांच्यामध्ये तोंडाचा कर्करोग, तसेच गर्भपाताचे प्रमाण पाहायला मिळते, असेही डॉक्टरांनी सांगितले.
नपुंसकत्वाचा धोका तारुण्याच्या उंबरठ्यावर
By admin | Published: May 31, 2017 2:36 AM