शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

रस्ता सुरक्षा अभियान - मावळात विविध उपक्रम

By admin | Published: January 24, 2017 1:58 AM

देहूरोड पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात २८ व्या राष्ट्रीय

देहूरोड : देहूरोड पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात २८ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली.ग्रामीण पोलीस, देहूरोड पोलीस वाहतूक शाखा, श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांच्या संदर्भात नागरिकांत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने देहूरोड ठाण्याचे निरीक्षक अरुण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक निरीक्षक अजित दळवी, ज्योती पाटील, मनोहर संकपाळ, वाहतूक विभागातील नारायण जमादार, आर. बी. दौंडकर, संदीप शिंदे, नवनाथ ननावरे व शिक्षक यांच्या उपस्थितीत रॅलीचे आयोजन झाले.रॅलीत विद्यार्थ्यांनी ‘वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहन चालविताना मोबाइल वापरू नका’, ‘सुरक्षित गती हीच जीवनाची हासी’, ‘एका क्षणाची घाई, आयुष्य वाया जाई’, ‘अती घाई संकटात जाई,’ आदी घोषणा देत शिवाजी विद्यालय, आंबेडकर रस्ता, देहूरोड बाजारपेठ, मंडई मार्गावर जनजागृती केली. जनजागृतीसाठी वर्दळीच्या ठिकाणी, महामार्गावर, मुख्य चौकांत व पेट्रोलपंपांवर जनजागृतीचे फलक लावले आहेत. देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर पट्ट्या बसविण्यात आल्या. वाहनचालकांना तिळगूळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विकासनगर व किवळे परिसरातील विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीबाबत वाहतूक शाखेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. देहूरोड ठाण्यात आयोजित कार्यक्रमात विस्डम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचा कारभार कसा चालतो, याची माहिती देण्यात आली. पोलीस दल वापरात असलेल्या शस्रांची पोलिसांकडून माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी पोलिसांना विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. (वार्ताहर)