शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

तीन महिन्यातच रस्त्याची दुरवस्था

By admin | Published: June 03, 2017 2:15 AM

: देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या चिंचोली (प्रभाग सहा) येथील गेल्या अनेक वर्षांपासून काही भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या चिंचोली (प्रभाग सहा) येथील गेल्या अनेक वर्षांपासून काही भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, सुधारणा व डांबरीकरण प्राधान्याने होणे अपेक्षित असताना सुस्थितीतील एका रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरण केलेला दुसऱ्या एका रस्त्याची महिन्यातच दुरवस्था होऊ लागली आहे. गेल्याच महिन्यात गटारींचे काम करणाऱ्या ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचे उघड झाले असताना रस्त्याच्या ठेकेदारानेही दर्जा राखला नसल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. बोर्डाच्या वतीने गेल्या महिन्यांत चिंचोलीतील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा ते जाधव आळी दरम्यानचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला. याकरिता बोर्डाने तेरा लाखांहून अधिक रक्कम खर्च केल्याचे सांगण्यात आले. वास्तविक या रस्त्यावर गटारींची कामे करताना गेल्या महिन्यात ठेकेदाराकडून पाईप टाकण्यासाठी दोन आडवे चर खोदण्यात आले होते. या व्यतिरिक्त एकही खड्डा या रस्त्यावर नसताना संपूर्ण रस्ता डांबरीकरण केल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. चिंचोलीतील मुख्य चौकातील मारुती- विठ्ठल रखुमाई व महादेव मंदिरासमोरचा दुरवस्था झालेला रस्ता गेल्या १५वर्षात दुरुस्ती, सुधारणा व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता उंच झाला असून व मंदिरासमोरच्या रस्त्यावर खोलगट भाग निर्माण झाला आहे. दोन्ही मंदिरासमोरच्या भागातील अगोदरच दुरवस्था झालेल्या रस्त्यावर येत्या पावसाळ्यात पाणी साचून राहणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. चिंचोलीत डांबरीकरण करण्यात आलेले दोन रस्ते दोन ठेकेदारांमार्फत करण्यात आले आहेत. प्राधान्यक्रम : आदेशास केराची टोपलीकॅन्टोन्मेंटने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला चिंचोलीतील अशोकनगरच्या सीमाभिंतीच्या बाजूने खरे चाळ, भेगडे आळीपासून पुढे बालघरे आळी भागातील रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. याकरिता सुमारे २४ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे स्थापत्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या महिन्यात दुरुस्ती सुधारणा, काही भागात रुंदीकरण व डांबरीकरण केलेल्या रस्त्याची काही दिवसातच दुरवस्था होण्यास सुरुवात झाली असून नागरिकांनी रस्त्याच्या कामाच्या दजार्बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही ठिकाणी हा रस्ता खचला असून त्यावर मोठ्या भेगा आहेत. काही ठिकाणी रस्ता फुगला असून तेथेही खड्डे पडणार असल्याचे दिसत आहे.कॅन्टोन्मेंट निवडणुकीनंतर मार्च २०१५ मध्ये झालेल्या बोर्डाच्या बैठकीत तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडियर सैफ खान यांनी विकासकामे करताना कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून कामे करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, कॅन्टोन्मेन्टने चिंचोलीत विविध विकासकामे करताना कोणताही प्राधान्यक्रम पाळला जात नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, बोर्डाच्या कोणत्याही प्रभागात सदस्यांनी सुचविलेली कामे करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.