पिंपरी : कटावणीच्या साह्याने कुलूप तोडून चोरट्यांनी निगडी, प्राधिकरण परिसरातील सात दुकाने फोडली. ही घटना सोमवारी पहाटे प्राधिकरण निगडी येथे उघडकीस आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा चोरटे निगडी प्राधिकरण येथील पेठ क्रमांक २६ ए स्क्वेअर या इमारतीमध्ये पहाटे दीडच्या सुमारास आले. सुरक्षा रक्षकाला दमदाटी करीत त्यांनी कटावणीच्या साह्याने सात दुकाने फोडली. पाच ते सहा जणांची ही टोळी चोरीच्या उद्देशाने पहाटे या परिसरात वावरत असल्याची माहिती रखवालदाराने दिली. काही ठिकाणी लॅपटॉप चोरून नेले. तर काही ठिकाणी अन्य साहित्य चोरले, ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. निगडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. एकाच वेळी सात दुकाने फोडल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
निगडी, प्राधिकरण परिसरातील सात दुकाने फोडली; कटावणीच्या साह्याने कुलूप तोडून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:17 PM
कटावणीच्या साह्याने कुलूप तोडून चोरट्यांनी निगडी, प्राधिकरण परिसरातील सात दुकाने फोडली. ही घटना सोमवारी पहाटे प्राधिकरण निगडी येथे उघडकीस आली.
ठळक मुद्देसुरक्षा रक्षकाला दमदाटी करीत चोरट्यांनी कटावणीच्या साह्याने फोडली सात दुकानेघटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद, परिसरात घबराट