पिंपरी : रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराने रिक्षातील प्रवाशाचा मोबाईल व ३० हजार रूपयांची रोकड असा ऐवज लंपास करून लुबाडणूक केली. ही घटना वाकड येथील भुमकर चौकात गुरूवारी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपू छोटेलाल वर्मा (वय ३४, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालक व त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वर्मा गुरूवारी दुपारी चार वाजता वाकड येथून एका रिक्षात बसले होते. रिक्षा भुमकर चौकात आल्यानंतर आणखी एक जण रिक्षात बसला. रिक्षा चालक व त्याचा साथीदार फिर्यादीकडून जबरदस्तीने मोबाईल व रोकड असा ३० हजार रूपयांचा ऐवज लुबाडून पसार झाले. रिक्षातून प्रवास करणे प्रवाश्यांसाठी असुरक्षित ठरू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी चिंचवड ते चिखली दरम्यान प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाने सुटे पैसे नाहीत म्हणून प्रवाशाला मारहाण केली. १० रुपये सुटे देत नाही म्हणून, प्रवशाचे १०० रुपये काढून घेतले. धक्काबुक्की करून प्रवाशाला सोडून रिक्षावाला निघून गेला. या घटनेनंतर दोन दिवसात घडलेली शहरातील ही दुसरी घटना आहे
वाकड येथे रिक्षाचालकाकडून प्रवाशाची लुबाडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 5:00 PM
वाकड येथून फिर्यादी एका रिक्षात बसले होते. रिक्षा भुमकर चौकात आल्यानंतर आणखी एक जण रिक्षात बसला. रिक्षा चालक व त्याचा साथीदार फिर्यादीकडून जबरदस्तीने मोबाईल व रोकड असा ३० हजार रूपयांचा ऐवज लुबाडून पसार झाले.
ठळक मुद्देअज्ञात रिक्षा चालक व त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल